• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर

by Nagesh Suryawanshi
August 25, 2019
in ताज्या घडामाेडी
0
हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर
7
VIEWS

पुणे :  आरोग्यानामा ऑनलाइन – हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयविकार होऊ शकतो. हृदयविकाराला वयाची अट नसते,कोणत्याही वयोगटातील माणसाला हा आजार होऊ शकतो असे मत सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ ईश्वर झंवर यांनी व्यक्त केले.

हिराबाई भिकाजी माने यांच्या पुण्यानुमोदनाच्या वेळी ते बोलत होते. कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल माने यांच्या मातोश्री हिराबाई माने यांचे रविवार दि. १८ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.श्रध्दांजली सभेस उपस्थित असणारे लोक गेलेल्या व्यक्तिच्या आठवणी जागवतात मात्र त्या आजाराबाबत जनजागृती करत नाहीत. सुनील माने यांनी डॉ. ईश्वर झंवर यांचे ‘ह्रदयविकाराची प्राथमिक लक्षणे’याविषयावर व्याख्यान आयोजित केले.अशाप्रकारचा कार्यक्रम घेऊन त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. लोकांना हृदय विकाराविषयी माहिती व्हावी, हृदय विकाराचा झटका आल्यानंतर कोणते प्रथोमपचार करावे हा त्यामागचा उद्देश होता.

डॉ. झंवर म्हणाले, पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात हृदय रोग होण्याचे वय कमी आहे. हृदय रोग होणाऱ्या व्यक्तींमध्ये पन्नास टक्के रुग्ण हे ३० ते ४० वर्ष वयोगटातील असतात. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर प्रत्येकाने हृदयाशी संबंधित लक्षणांना गांभीर्याने घेणे आवश्यक असते. मधुमेहाच्या रुग्णांना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. तिशीनंतर प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबात रक्ताच्या नात्यात कोणाला हृदयरोग झाला असेल तर तुम्हाला हृदय रोग होण्याची शक्यता अधिक असते. हृदय रोगामुळे तुम्हाला तुमच्या मेंदू आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार होऊ शकतात. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल या तीन गोष्टी नियंत्रणात ठेवल्यास तसेच धूम्रपान,मद्यपान न केल्यास हृदयरोगाचा धोका टाळता येवू शकतो. आहार, विहार व जीवनशैली उत्तम ठेवल्यास आपण हृदयविकारावर मात करू शकतो.

हिराबाई माने यांना श्रद्धांजली वाहताना मिलिंद कुलकर्णी यांनी आई विषयी कवितांचे सादरीकरण करताना उपस्थितांचे अश्रू अनावर झाले.निवृत्त आयपीएस अधिकारी अशोक धिवरे यांनी आईचे जीवनातील अस्तित्व शब्दापलीकडे असल्याने तीला चाकोरीत बांधता येत नसल्याचे सांगितले. आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, प्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक अंबरीश दरक, विशाल तांबे यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे महानगरपालिकेचे शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवक उमेश गायकवाड, दीपक पोटे, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अजय खेडेकर, उज्ज्वल केसकर, जयंत येरवडेकर, दत्ताजीराव गायकवाड यांच्यासह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

Tags: arogyanamaBodydoctorhealthआजारआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचारक्त पुरवठाव्यायामशरीरहृदय विकार
Pregnant women
माझं आराेग्य

गरोदरपणात नियमित करा ‘या’ ५ गोष्टी, होईल नॉर्मल डिलेव्हरी

August 18, 2019
जळजळ
माझं आराेग्य

पोटातील जळजळ, गॅससाठी करा घरगुती उपाय 

April 22, 2019
mosquitoes
माझं आराेग्य

डासांमुळं त्रस्त आहात ? ‘हे’ 6 सोपे घुरगुती उपाय करा ! जवळही फिरकणार नाहीत

January 5, 2021
बुद्धी आणि एकाग्रता वाढविण्यासाठी तुळशीची पाने ‘गुणकारक’, जाणून घ्या  
ताज्या घडामाेडी

बुद्धी आणि एकाग्रता वाढविण्यासाठी तुळशीची पाने ‘गुणकारक’, जाणून घ्या  

July 23, 2019

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 hour ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

3 hours ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

7 hours ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.