आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दिवसापूर्वी अगदी ठणठणीत असलेल्या व्यक्तीलाही हार्टअटॅक येऊ शकतो. हार्टमध्ये दोन प्रकारचे ब्लॉकेज असतात. एक ब्लॉकेज हळहळू वाढतो तर दुसरा ब्लॉकेज जलद वाढतो. अचानक ब्लॉकेज झाल्यास क्लॉट म्हणजेच गाठ तयार होऊन रक्तप्रवाह थांबतो. यामुळे हार्ट डॅमेज होते आणि हार्टअटॅक येतो. लट्ठपणा, ब्लड प्रेशर, तंबाकू खाणे, सिगरेट पिणे, व्यायाम न करणे आदी कारणांमुळे हार्टअटॅकचा धोका वाढतो.
हे उपाय करा
* किमान पंधरा मिनिटे व्यायाम करा. योगही करू शकता.
* नियमित पाच मिनिटे मेडिटेशन करा.
* दररोज तीन ते पाच किलोमीटर चाला.
* पायी चालताना छातीत वेदना जाणवल्यास डॉक्टरांना दाखवावे.