आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे जास्तवेळ घरात राहावे लागत असल्याने ही समस्या आणखी वाढली आहे. या समस्येची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये जंक फूड हे प्रमुख कारण आहे. अनुवंशिकता हे सुद्धा कारण आहे. यासाठी जंक फूड बंद केले पाहिजे. सोबतच जीवनशैली बदलणे, आहारात बदल आणि व्यायाम याकडे लक्ष ठेवणे जरूरी आहे. तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा नियंत्रण ठेवायचे असेल या तीन वस्तूंचे सेवन करा.
हे सेवन करा
1 ब्रोकली
ब्रोकलीमध्ये कॅलरीजची मात्रा खुप कमी असते. जर तुम्ही 150 ग्रॅम ब्रोकलीचे सेवन केले, तर यातून केवळ 45 कॅलरीज प्राप्त होतात. तसेच ब्रोकली डायजेस्ट होताना फॅट बर्न होते. वजन कमी करायचे असेल तर ब्रोकली जरूर सेवन करा.
2 काकडी
काकडीत पाणी भरपूर असते आणि कॅलरीज खुप कमी असतात. 100 ग्रॅम काकडीत अवघ्या 10 कॅलरीज असतात. सोबतच यामध्ये फायबर असते, जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. डॉक्टर्स सुद्धा काकडी खाण्याचा सल्ला देतात.
3 सफरचंद
तुम्ही नाश्त्यात हेवी डाएटऐवजी फळे घेऊ शकता. नाश्त्यात सफरचंद, गाजर आणि काकडी सेवन करू शकता. एका सफरचंदमध्ये अवघ्या 25 कॅलरीज असतात. हे डायजेस्ट करण्यात उर्जा खर्च होते. म्हणजेच यातून अवघी 10 ते 15 कॅलरीज मिळते. हे वजन कमी करण्यासाठी खुप लाभदायक आहे.