Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health Tips | भारतीय लोक असा आहार खातात, ज्यामध्ये योग्य प्रमाणात पौष्टिक फळे आणि भाज्यांचा अभाव असतो. याशिवाय भारतातील ८० दशलक्ष लोकांना मधुमेह आहे, जे हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणूनच २०२३ मध्ये निरोगी राहण्यासाठी आहारात या ४ पदार्थांचा समावेश नक्की करा. (Health Tips)
१. हळद
हा अँटी-इंफ्लेमेटरी मसाला आतड्याच्या आवरणात आणि संपूर्ण शरीरात सूज कमी करण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे बरे वाटते. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे लिव्हरच्या दुसऱ्या टप्प्याच्या सक्रियतेस उत्तेजित करते, ज्यामुळे शरीराची संपूर्ण स्वच्छता होते.
२. स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी भूक आणि हेल्थ गोल पूर्ण करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. स्ट्रॉबेरीमध्ये पॉलिफेनॉल मुबलक प्रमाणात असते, जे एक चांगले अँटिऑक्सिडेंट आहे. त्यात व्हिटॅमिन सी, मँगनीज, फोलेट आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे, जे इम्युन हेल्थ, मेंदूचे कार्य, सेल ग्रोथ आणि ब्लड प्रेशर रेग्युलेशनसाठी महत्त्वाचे आहे.
३. सॅल्मन फिश
सॅल्मन फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
हे एक आम्ल आहे जे शरीर बनवत नाही, म्हणून त्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
४. अंकुरित ब्रोकोली
अंकुरित ब्रोकोली हे फायबर, व्हिटॅमिन सी आणि सल्फोराफेनने भरलेले पोषणाचे पॉवरहाऊस आहे.
तसेच, यातील सल्फोराफेनमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कॅन्सर गुणांसह क्रुसिफेरस भाज्यांमधील एक कम्पाउंड आहे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Health Tips | Health will change completely in 2023, include these 4 foods in your diet plan
Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या दुधी भोपळ्याचे सूप, सोबतच आरोग्याला होतील अनेक फायदे!
Stone Fruits | कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर कमी करतात स्टोन फ्रूट, जाणून घ्या हे काय आहे