आरोग्यनामा ऑनलाइन टीम – व्हायरल इंन्फेक्शनची शक्यता दूर करण्यासाठी आहारात योग्य बदल करून शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक असते. प्रतिकारशक्ती वाढवण्यास साहाय्यक असलेल्या रक्तपेशींची कार्यक्षमता वाढविण्यासाठी काही खास पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ कोणते याची माहिती घेवूयात.
गाजर
सर्दी-खोकला यासारख्या समस्या नियंत्रित करण्यासाठी गाजराचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे. यातील बीटा-कॅरोटिन नावाच्या घटकामुळे सफेद रक्तपेशी आणि टी सेल्सच्या संख्येत वाढ होते. ही वाढ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहे.
दही
जेवणासोबत दह्याचे सेवन केल्यानेही प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या चांगल्या बॅक्टेरियामुळे सालमोनेला आणि ई कोली यासारखे हानिकारक बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत. दह्यामुळे पचनक्रिया सुधारते.
पालक
जेवणात पालक व इतर पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पालकात भरपूर फोलेट असते. तसेच यामुळे डीएनए आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होत नाही.
लसूण
बाह्यसंसर्ग आणि साथरोगांना दूर ठेवण्यात लसणाची महत्त्वाची भूमिका आहे. लसणात असलेला अॅलिसिन आणि एजॉइन नावाचा घटक हानिकारक बॅक्टेरियांपासून संरक्षण करतो. लसूण खाणे फायदेशीर आहे.