आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ब्रेस्ट कॅन्सर वेळीच ओळखणे खूप कठीण आहे पण ते अतिमहत्त्वाचेही आहे. कारण जर आपल्याला या कर्करोगाची लक्षणे लक्षात आली तर हे लाईफ सेव्हर ठरू शकतं. ब्रेस्ट कॅन्सर हा सर्व प्रकारांमधील सर्वसामान्य आजार आहे आणि भारतात तर, प्रत्येक ८ महिलांपैकी एक महिला या कर्करोगाने ग्रस्त असते. शरीरातील पेशी सतत वाढत असल्याने या पेशींचे तुकडे रक्तप्रवाहाद्वारे इतरत्र भागांत प्रवेश करतात आणि त्यांचा विस्तार होत जातो. याला मेटास्टेसिस म्हणतात. मेटास्टेसिस हा कर्करोगाचा एक स्तर आहे.
कसा होतो कॅन्सर : स्तन शरीराचा महत्वाचा अवयव आहे. स्तनाचे मुख्य कार्य दुग्ध उत्पादक पेशींमार्फत दुग्ध निर्मिती करणे. स्तन पेशी सूक्ष्म वाहिन्यांद्वारे निप्पलशी जोडलेल्या असतात. याचबरोबर इतर पेशी, फाईब्रस मटेरिअल, चरबी, नाड्या, रक्तवाहिन्या आणि काही लिंफँटिक चॅनलही असतात जे स्तनाची संरचना पूर्ण करतात . स्तन कॅन्सरच्या सूक्ष्म वाहिन्यांमध्ये कॅल्सिफिकेशन चे लहान कण जमल्याने पेशीमध्ये छोटी गाठ बनते आणि तिची वाढ होऊन कॅन्सर मध्ये रूपांतरित होते. याचा प्रसार लिंफँटिक चॅनेल रक्तप्रवाहाद्वारे पूर्ण शरीरभर प्रसार करते.
कॅन्सरची लक्षणे :
– स्तनामधील गाठ
– स्तनाच्या आकारातील वाढ किंवा बदल
– संपूर्ण स्तन किंवा निपलचे लाल होणे
– स्तनांमधून पांढरे किंवा अन्य द्रव्य बाहेर येणे
– स्तनांतील पेशी जास्तवेळ ताठर बनून राहणे
– स्तनावर ओरखडे दिसणे
अनुवांशिक स्तन कर्करोग पिढी दर पिढी वाढत असतो. यांच्यात फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे परिवारात एखाद्या सदस्याला आधी कर्करोग असेल तर येणाऱ्या पुढच्या महिलेस स्तनाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. याला बीआरसीए १ आणि बीआरसीए २ हे दोन घटक कारणीभूत असतातआणि याच दोन घटकांमुळे कर्करोगाचा स्तर ओळखता येतो. ५० वर्षंयांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांमध्येही मोठ्या प्रमाणात कॅन्सर आढळून येतो. स्त्री हार्मोन इस्ट्रोजेन चा जास्त स्राव, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर व मेनोपॉस नंतर हार्मोन रिप्लेसमेंट यामुळेही कॅन्सर होऊ शकतो. लठ्ठपणा आणि अल्कोहोलमुळेही कॅन्सर होतो.
स्तनाच्या कर्करोगावरील उपाय :
१) अल्कोहोलिक पदार्थांचे सेवन टाळणे.
२) नियमित व्यायाम करणे.
३) योग्य पदार्थ किंवा आहाराचा समावेश असणे.
४) मेनोपॉसनंतर एविस्टा रेलोक्सोफिन स्तनाच्या कॅन्सरसाठी उपयुक्त.