आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गुळाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार, गूळाच्या नियमीत सेवनाने तुम्ही अनेक रोगांना स्वत:पासून दूर ठेवू शकता. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. अनेक व्याधींवर गूळ गुणकारी मानला जातो. जाणून घ्या गुळाचे आरोग्यदायी फायदे –
थकवा आणि अशक्तपणा –
सतत फार जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर गुळाचं सेवन केल्याने ऊर्जा वाढण्यास मदत होते. ताकद वाढवण्यासाठी तुम्ही नियमीत गुळाचं सेवन केलं पाहिजे. गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते. शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो.
रोगप्रतिकार शक्तीत वाढ-
जिरं आणि गूळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर करण्यासाठी फार चांगला नैसर्गिक उपाय आहे. तसेच शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
ताप- डोकेदुखीवर गुणकारी –
गूळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्याने डोकेदुखी थांबते. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा डोकेदुखीच्या समस्या होत असेल तर हा उपाय नियमित करा. डोकेदुखी शिवाय जिरं आणि गुळाचं पाणी ताप कमी करण्यासाठीही उपयोगी आहे.
शुगरचं प्रमाण वाढत नाही –
गूळ पचनालाही हलका असतो आणि याने शुगरचं प्रमाणही वाढत नाही. त्यामुळे शुगरची समस्या असणाऱ्यांसाठी गूळ फायदेशीर ठरतो.
चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर –
रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.
वजन कमी करणे-
गुळाचा वजन कमी करण्यात देखील फायदा होतो. ह्यासाठी रोज गुळाचा चहा घ्यावा. ह्याने वजन कमी होण्यास मदत होते.
एनिमियाचा त्रास दूर –
गुळामध्ये आयर्नचा समावेश असतो. त्यामुळे सकाळी-सकाळी पाण्यासोबत याचं सेवन केल्यास एनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो.
श्वसनविकार –
श्वासासंबंधी काही त्रास असेल तर पाच ग्रॅम गुळ सरसो तेलात मिसळून खाल्ल्याने श्वसनाशी निगडीत समस्या दूर होईल.
कान दुखी –
कान दुखत असेल तर त्यावरही उपाय म्हणून गुळ वापरता येतो. गुळाला तुपासोबत मिसळून खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल.
सर्दी, खोकल्यावर गुणकारी –
बदलेल्या आणि थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला यांसारखे आजार होण्याचा धोका असतो. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गुळाच्या चहाचं सेवन करू शकता. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे फायबर मोठ्या प्रमाणावर असते. अस्थमा, ब्रोंकायटिस आणि एलर्जी संबंधित आजारांवर गुळाच्या चहाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.