आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हॉर्स रायडिंग म्हणजेच घोडेस्वारी हा फिटनेसचा एक चांगला पर्याय आहे. हा क्रीडा प्रकार सर्वांच्याच परिचयाचा आहे. यामुळे परिपूर्ण शारीरिक कसरत सुद्धा होते. तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित व्यायामासोबत स्नायूची स्थिती चांगली होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह भरपूर ऊर्जा मिळते.
हे आहेत फायदे
* घोडस्वारीमुळे रक्तसंचार आणि श्वासोछ्वास चांगला होतो. शरीर रचनादेखील चांगली होते. इतर शारीरिक कसरतीपेक्षा ही वेगळी कसरत आहे. घोड्यावर बसल्याने एक लयीत संपूर्ण शरीराची हालचाल होत असते. यामुळे शरीराच्या जवळपास सर्व स्नायूंची कसरत होते.
* मन एकचित्त करण्याची क्षमता वाढते.
* संयम वाढतो. यात ताळमेळ बसवण्या साठी संयम गरजेचा असतो.
* तणावापासून मुक्ती मिळते.
* व्यक्ती आशावादी होतो.
* मूड चांगला राहण्यास मदत होते.
* स्वत:वरचा विश्वास वृद्धिंगत होतो. हा आत्मविश्वास रोजच्या आयुष्यात उपयोगी ठरतो.
* व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, चपळता, एकाग्रता आणि संतुलन अशा गोष्टी वाढतात.
* सजगता वाढते. याचा फायदा वैयक्तिक आयुष्यात देखील होतो.