आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जेवणानंतर कित्येक लोकांना बडीशेप खाण्याची सवय असते. ही सवय चांगली ही असते. जेवणा नंतर बडीशेप खाल्याने तोंडात दुर्गंधी येत नाही. पण याच सोबत बडीशेपचे आरोग्यासाठी फायदे माहित आहेत का ? चला जाणून घेऊया बडीशेप खाण्याचे फायदे
-वजन कमी करण्यास बडीशेपचा खूप फायदा होतो. बडीशेप मध्ये १७% व्हिटॅमिन, ७% कॅल्शियम, ६% आयर्न, ६%मॅग्नेशियम, ३%पोटॅशियम आणि १९% मॅगनीजचा समावेश असतो. बडीशेप मध्ये कॅलरीची मात्रा खूप कमी असते. या शिवाय बडीशेप मध्ये असे घटक असतात जे मेटाबॉलिजम प्रकिया वाढवते यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
– बडीशेप पोटांच्या समस्यांवर उत्तम उपाय आहे. बडीशेपचा पाणी पिल्याने आणि बडीशेप खाल्याने कब्ज , ॲसिडिटी आणि अपचन सारख्या समस्या पासून मुक्ती मिळते. बडीशेप पचन क्रिया सुरळीत करण्यास मदत करते.
-बडीशेपमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. हेच कारण आहे की नियमित बडीशेपच्या पाण्याचा सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढतो. ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्या रुग्णांनी नियमित बडीशेपच्या पाण्याचा सेवन करावा.
– रक्त शुद्धी साठी बडीशेप खूप महत्त्वाचे काम करते. बडीशेप मध्ये नैसर्गिक रीत्याच डी – टॉक्स करण्याचा गुण असल्याने रक्तातील अस्वछ पदार्थ काढण्यात मदत करते. ज्यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचेवर निखार येते.
– उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी बडीशेपचा पाणी उपयुक्त असतो. कारण बडीशेपाच्या पाण्यात पोटॅशियमची मात्र जास्त असते.