आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अशक्तपणा किंवा जास्त दमल्यामुळे थकवा येतो. अनेकदा हा थकवा तुमच्या जीवनशैलीशी निगडीत असतो. दिर्घकाळ काम करणे, जेवण टाळणे, अतिश्रम आणि कमी झोप ही थकवा येण्याची काही मुख्य कारणे आहेत. जाणून घ्या थकवा दूर करण्यासाठी उपाय
थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्त रहाण्याचा प्रयत्न करा. तणावामुळे शरीराची ऊर्जा संपते व थकवा येतो. अशावेळी दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा.
सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चीडचीड होते.
पाण्यात थोडेसे मीठ टाकून आंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो.
जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफीनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
थकवा दूर करण्यासाठी खालील पदार्थांचे सेवन करा.
दही
दह्यात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. याशिवाय दह्यातील प्रोबायोटिक्सच्या पुरेशा प्रमाणामुळे थकवा दूर होण्यास मदत होते.
केळी
केळीत व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. हे सर्व घटक थकवा दूर होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.केळ्यामध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराची गेलेली शक्ती पुन्हा मिळविण्यास त्याचा फायदा होतो.
लाल सिमला मिर्ची
शरीरात व्हीटॅमिन सीची कमतरता असल्यास थकवा येऊ शकतो. व्हीटॅमिन सी मिळवण्यासाठी व शक्ती वाढवण्यासाठी लाल सिमला मिर्चीचा समावेश करा.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटसमुळे तो प्यायल्यावर आपल्याला तरतरी आल्यासारखे वाटते. ‘ग्रीन टी’मधील पॉलिफिनोल्समुळे ताण दूर होण्यास तसेच मानसिक स्थैर्य येण्यास मदत होते.