आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कित्येकदा व्यक्ती कधी कळत तर कधी न कळत विष पिऊन जातो. पण अशा वेळी जर तातडीने रुग्णालयात नेता येत नसेल तर काय करता येईल ??? यावर आम्ही सांगत आहोत काही उपाय. पण नेहमी लक्षात ठेवा विष घेतलेल्या व्यक्तीला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जाणे फार गरजेचे असते. जर तसे शक्य नसल्यास काही घरगुती उपाय करू शकता . तर पाहुयात अशाच काही घरगुती उपाय
मोहरीचे बी
जर एखाद्या व्यक्तीने विष पिला असेल तर त्यावर अगदी साधा आणि सरळ उपाय म्हणजे त्या व्यक्तीला उल्टी करू करवा . यासाठी थोडे मोहरीचे बी घेऊन ते कुटून पाण्यात मिळवा आणि त्या व्यक्तीला पाजा. मग काहीवेळातच त्या व्यक्तीला उल्टी होतील आणि यामुळे विषही बाहेर पडेल.
मिठाचा पाणी
जर व्यक्तीने विष घेतले असेल तर त्या व्यक्तीला मिठाच्या पाण्याचा सेवन करू द्या. एका ग्लास मध्ये मुठभर मीठ मिसणून हे पाणी त्या व्यक्तीला प्यायला दिल्याने त्या व्यक्तीला लगेच उल्टी होते आणि शरीरातील विष बाहेर टाकले जाते.
टाळूला दाबा
जर रुग्ण उल्टी करत नसेल तर त्या व्यक्तीच्या माने मागे हळूवार पणे थोपटे किंवा त्याचा टाळू दाबा यामुळे तो व्यक्ती लगेच उल्टी करेल.
कच्चा अंडा
विष घेतलेल्या व्यक्तीला चांगला फेटलेला कच्चा अंडा द्यावा किंवा पीठ मिसळेला पाणी द्यावे ज्याने लगेच उल्टी होण्याची शक्यात असते. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, त्या व्यक्तीच्या उल्टी मधील रंग बदलत नाही तोपर्यंत उल्टी होऊ द्यावे.
बेहोश व्यक्तीला उल्टी नका करवू
जर व्यक्ती विष घेतल्यानंतर बेहोश झाला असेल तर त्याला उल्टी करवू नका. कारण अशा वेळी त्यांचा श्वास थांबलेला असतो. तर त्या व्यक्तीला लगेच रुग्णालयात घेऊन जावा.