मुलांना नैसर्गिकरित्या गोरे करतात ‘हे’ ५ घरगुती उपाय; जाणून घ्या  

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गोरा रंग सर्वांनाच आवडतो. त्यामुळे सर्वचजण गोरे होण्यासाठी उपाय शोधत असतात. मुलींप्रमाणेच मुलंही गोरं होण्यासाठी अनेक उपाय शोधतात. काहीजण तर अनेक क्रीमचा वापर करतात. या क्रीमच्या तुलनेत तुम्ही जर सुंदर दिसण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर तुमचा रंग लवकर उजळेल. त्यामुळे मुलांना जर नैसर्गिकरित्या गोरं व्हायचं असेल तर त्यांनी खालील काही घरगुती उपाय करा.

१) लिंबू :

मुलांना जर नैसर्गिक पद्धतींनी गोरे व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या शरीराचा रंग उजळ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाच्या मिश्रणाने पुर्ण शरीरावर मसाज  करा. तुम्ही रोज असे केल्याने १० दिवसाच्या आत तुमची त्वचा उजळ दिसेल.

२) गुलाबजल :
gulab-pani
गुलाबजलमध्ये लिंबाचा रस मिसळून तो तुमच्या शरीराला लावल्याने त्वचा ब्लीच होते आणि तुमच्या त्वचेचा रंग हळूहळू उजळू लागतो.

३) दही :

मुलांनी जर आपल्या शरीराचा दही आणि लिंबाने मसाज केला तर त्यांचा रंग उजळण्यास मदत होते. त्यामुळे मुलांना नैसर्गिकरित्या गोरे होण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे.

४) जीरे :

बारीक केलेले जीरे पाण्यात टाकून अंघोळ केल्याने स्किन टोन चांगला  होतो.  जीरा पावडर आणि दूध मिक्स करुन संपुर्ण शरीरावर लावल्यानेही लवकर फरक जाणवेल.