तुमच्या चेहऱ्यायावर सूज येण्यामागे असू शकते गंभीर कारण

face

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – चेहरा जास्त सुजल्यासारखा वाटणे, डोळे बारीक दिसणे, अशी लक्षणे चेहऱ्यावर दिसू लागली तर वेळीच सावध होऊन डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. ही लक्षणे अँलर्जीची असू शकतात. खाण्यापिण्यातील निष्काळजीपणामुळेही हा त्रास होऊ शकतो. चेहऱ्यावर थोडी सूज आल्यावर पटकन लक्षात येत नाही. कधी-कधी चेहऱ्याच्या एखाद्या भागावर सूज दिसते आणि अनेकदा संपूर्ण चेहऱ्यावर सूज असते. अनेकदा ही सूज काही तास तसेच काही दिवस राहू शकते. यास कारणीभूत घटक कोणते आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती असेण आवश्यक आहे.

शरीरात होणारे अंतर्गत बदल आणि बाह्य कारणांमुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते. चुकीच्या कॉस्मेटिक्सचा वापर, खाद्यपदार्थ अथवा औषधींची अँलर्जी निर्माण करणारे घटक श्वासाद्वारे शरीरात गेल्यास असे होते. काहीवेळा ओरल कॅव्हिटी वा दातांशी निगडित समस्यांमुळेही चेहऱ्यावर सूज येऊ शकते. चेहऱ्याच्या उतीत फ्लुइड म्हणजेच पाणी गोळा झाल्यामुळेच चेहरा सुजल्यासारखा दिसतो. त्यास वैद्यकीय भाषेत फेशियल एडेमा म्हणतात. हा एखाद्या आरोग्य समस्येचा संकेत असू शकतो. चेहऱ्याची शस्त्रक्रिया वा बोटोक्स इंजेक्शननंतर जर चेहऱ्यावर सूज आली तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. एखादी जखम, उष्ण वातावरण, मधुमेह, पडसे, हायपोथायरॉडिझम असल्यास आणि पोषक द्रव्यांचा अभाव असल्यासही चेहऱ्यावर सूज येऊ लागते.

चेहऱ्यावर सूज दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टर तपासणी करून योग्य ते उपचार करू शकतात. जर एखाद्या औषधाच्या सेवनाने असे झाले असेल तर त्याचे सेवन लगेच बंद करण्याचा आणि अँलर्जी रिअ‍ॅक्शन असेल तर डॉक्टर अँटिबायोटिक घेण्याचा सल्ला देतात. सूज आणि थोड्या वेदनाही असतील तर अशावेळी इम्फ्लेमेंटरी औषध दिले जाते. दातांना असा संसर्ग झाला तर तेव्हाही अँटिबायोटिक वा जास्त त्रास झाल्यास दात काढण्याची वा योग्य उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो.चेहऱ्यावर सूज आल्यास बर्फ लावावा. यामुळे सूज कमी होऊ शकते. मुलायम टॉवेल वा एखाद्या कपड्यात बर्फाचा तुकडा ठेवून सूजलेल्या जागी हळूहळू लावा. असे दिवसातून चार ते पाच वेळा करा. हळद व चंदन चेहऱ्यावरील सूज वा वेदना दूर करण्यात रक्तचंदन वा हळदीच्या पुडीपासून तयार केलेला लेप गुणकारी ठरतो. हा लेप वाळल्यानंतर तो कोमट पाण्याने धुऊन टाकावा. कमी मीठ अधिक सोडियम म्हणजेच जास्त मीठ असलेला आहार घेतल्यानेही चेहऱ्यावर सूज येते. मिठाच्या जास्त प्रमाणामुळे त्वचेचा आतला थर पाणी रोखू लागतो आणि चेहरा सूजल्यासारखा दिसतो. त्यासाठी जास्त मीठ असलेले भोजन टाळले पाहिजे.