डोळ्यांचे नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवण्यासाठी करा ‘हे’ खास ९ उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम डोळ्यांवर सुद्धा होत आहे. कंप्यूटर आणि मोबाईलचा जास्त वापर तसेच अपुरी झोप यामुळे डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोळ्यांची नैसर्गिक चमक गायब होते. डोळ्यांची हरवलेली चमक पुन्हा आणण्यासाठी काही खास उपाय असून या उपायांची माहिती आपण घेणार आहोत.
हे उपाय करा
ऑलिव्ह आणि ऑइल टी बॅग
वापरलेल्या टी बॅग थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही डोळ्यांवर टी बॅग ठेवाल तेव्हा डोळ्यांना ऑलिव्ह ऑइल लावा.
पुदीना
रोज झोपताना पुदीन्याची पाने एका वाटीत क्रश करा, यामध्ये थोडे पाणी टाका. यामध्ये बदाम तेल आणि मध मिळवा. हे डोळ्यांना लावा. डोळ्यांना आराम मिळेल आणि नैसर्गिक सौंदर्य पुन्हा येईल.
मध आणि इलायची
इलायचीचे दाने एक चमचा मधामध्ये मिसळवा. हे मिश्रण रोज सकाळी डोळ्यांवर लावा.
दूध
एक कप गार दूध घ्या. त्यामध्ये कॉटन बॉल बुडवा आणि एक मिनिट भिजू द्या. आता आरामात झोपा आणि कॉटन बॉल १० ते १५ मिनिट डोळ्यांवर ठेवा.
गुलाब जल
एका वाटीत फ्रिजमध्ये ठेवलेले गुलाब जल घ्या. यामध्ये काही कॉटन बॉल बुडवा. यानंतर आरामात झोपा आणि डोळ्यांवर कॉटन बॉल ठेवा. हे डोळ्यांची नैसर्गिक चमक कायम ठेवते.
लेवेंडर ऑइल
एका पातेल्यात अर्धा लीटर पाणी घ्या. यामध्ये थोडे लेवेंडर ऑयल टाका . हे चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. आता यामध्ये कॉटन बॉल बुडवा आणि हे कॉटन बॉल डोळ्यांवर ठेवा.
बटाटा स्लाइस
बटाट्याचे स्लाइस कापून डोळ्यांवर ठेवल्याने डार्क सर्कलची समस्या दूर होते. तसेच डोळ्यांची चमक पुन्हा येते.
Comments are closed.