आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विविध गोड पदार्थांमध्ये विलायचीचा सुगंधासाठी उपयोग केला जातो. विलायची गोड पदार्थांची चव सुद्धा वाढवते. माउथ फ्रेशनर म्हणूनही तिचा उपयोग केला जातो. यात आयर्न आणि रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन सी आणि नियासिन असते. हे लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी उपयोगी असते. विलायची खाण्याचे अनेक फायदे ते जाणून घेवूयात.
फुफूसांसंबंधीत आजार
विलायची दमा, खोकला, सर्दी आणि फुफूसांसंबंधीत आजारांपासुन आराम देते. विलायचीचे सेवन केल्याने कफ बाहेर पडतो. सर्दी झाली तर वाफ घेताना गरम पाण्याच्या भांड्यात थोडेसे विलायची तेल टाका.
एनीमिया
रात्री एक ग्लास गरम दूधामध्ये एक-दोन चिमुट विलायची पावडर आणि साखर टाकून घ्या. यामुळे एनीमियाचे लक्षण आणि अशक्तपणापासुन आराम मिळतो.
कँसर
विलायची मॅगनीजचे एक प्रमुख स्त्रोत आहे. मॅगनीज एंजाइमच्या स्रावमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. हे फ्री रॅडिकल्सला नष्ट करते. याव्यतिरिक्त विलायचीमध्ये शरीरातून विषारीतत्त्व बाहेर काढण्याचे गुण असतात. ही कँसरपासुन वाचवते.
हृदयाची गती
विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. निरोगी हृदयासाठी नियमित विलायचीचे सेवन करा. विलायचीची चहा पिण्यास सुरुवात करा.
पचनक्रिया सुधारते
विलायचीचा वापर माउथ फ्रेशनर म्हणून केल्यास नैसर्गिकरित्या गॅसला नष्ट करण्याचे काम करते. विलायची पचनशक्ती वाढवण्यात, पोटाची सूज कमी करण्यात आणि छातितील जळजळ संपवण्याचे काम करते.
श्वासाची दुर्गंधी
विलायचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. यासोबतच विलायचीची तिखट चव आणि सुगंध श्वासांची दुर्गंधी दूर करते.
अॅसिडिटी
विलायचीतील तेल अॅसिडिटीला नष्ट करते. विलायची चावल्यानंतर त्यामधून अनेक प्रकारचे तेल बाहेर पडतात. जे तुमच्या लार ग्रंथींना उत्तेजित करतात.