हे उपाय करा
* केसांमध्ये होणारा कोंडा, डँड्रफ नियंत्रणात आणण्यासाठी कडुलिंबाच्या बीया आणि करंजी झाडाच्या बियांचा उपयोग होतो. लिंब आणि करंजीच्या बिया समान प्रमाणात घेऊन स्नान करण्यापूर्वी याच्या २ ग्रॅम चूर्णात थोडेस पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांना लावून दररोज स्नान केल्यास थोड्याच दिवसात डँड्रफची समस्या दूर होते.
* लिंबाच्या बियापासून तयार केलेले तेल रात्री केसांना लावावे. सकाळी स्वच्छ पाण्याने डोकं धुवा. नारळाच्या तेलामध्ये लिंबाच्या बिया उकळून या तेलाने आठवड्यातून दोन वेळेस मालिश करण्याचा सल्ला देतात.
* करडई म्हणजेच कुसुम बियांचे चूर्ण आणि बाभळीच्या सालीचे चूर्ण समान प्रमाणात तव्यावर भाजून घ्यावे. भाजल्यामुळे याचे राखेसारखे मिश्रण तयार होते. हे मिश्रण नारळ किंवा मोगऱ्याच्या तेलामध्ये मिसळून, या तेलाने मालिश केल्यास केस लवकर वाढतात तसेच या उपायाने टक्कल पडत नाही.
* इंद्रावणी नामक झाडाचे मूळ गोमुत्रामध्ये मिसळून डोक्याला लावावे. दररोज हा उपाय केल्यास टक्कल पडण्याची समस्या दूर होते आणि केसांचे मूळ मजबूत होते. इंद्रावणीचा वेल असतो याला मराठीत कडू इंद्रावण, गुजरातीमध्ये इंदखणी, हिंदीत इंद्रायण व इंग्रजीत सिट्रलस कोलोसिंथिस म्हणतात.
* केसांवर नारळातील ताजे पाणी लावून हलक्या हाताने मालिश केल्यास केस मुलायम होतात. केस गळतीची समस्या दूर होते. अनेक भागांमध्ये ताज्या नारळातील मलईने केसांची मालिश करतात.
* आवळ्याचे चूर्ण घेऊन त्यामध्ये एक टोमॅटो मिसळून हे मिश्रण केसांना लावून २० मिनिट मालिश केल्यास डँड्रफची समस्या नष्ट होते. हा उपाय आठवड्यातून एक दिवस तरी करावा.
* घनदाट आणि मजबूत केसांसाठी शंखपुष्पीचे ताजे रोप वाळवून चूर्ण तयार करावे. हे चूर्ण नारळाच्या तेलामध्ये टाकून मंद अग्नीवर २०-२५ मिनिट गरम करावे. थंड झाल्यानंतर गाळून हे तेल केसांना लावल्यास केस मजबूत आणि घनदाट होतात.
* जास्वंदाचे ताजे लाल फुल हाताने बारीक करून हा रस स्नान करताना केसांना लावावा. जास्वंद कंडीशनरप्रमाणे काम करते. जास्वंदाचे फुल बारीक करून त्याची पेस्ट करावी, ही पेस्ट केसांवर लावल्यास डँड्रफ नष्ट होते.
* अनंतमूळचा चहा केसांसाठी उपयुक्त आहे. हा चहा तयार करण्यासाठी अनंतमूळच्या मुळासोबत काही प्रमाणात शाल्मली झाडाची साल वापरावी. पाण्यामध्ये हे दोन्ही उकळून थंड झाल्यानंतर गाळून हा चहा प्यावा. या उपायाने केस गळण्याची समस्या दूर होते असे मानले जाते. शाल्मली झाडाला सांवर, सांवरी, सौर असेही म्हणतात.