आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Drinking Water Mistakes | ज्याप्रमाणे व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स (Vitamins, Minerals, Proteins, Fats, Carbohydrates) इत्यादी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, त्याचप्रमाणे निरोगी शरीरासाठी पाणी देखील अत्यंत आवश्यक (Water Is Essential For Healthy Body) आहे. हे केवळ शरीराला हायड्रेट ठेवत नाही तर शरीराचे कार्य अधिक चांगले करण्यास मदत करते. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याची शिफारस करतात (Drinking Water Mistakes).
पिण्याच्या पाण्याचे केवळ प्रमाणच नाही तर ते पिण्याची पद्धत देखील जाणून घेणे आवश्यक आहे. हेल्थ शॉट्समध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, तुम्ही उभे राहून पाणी प्यायल्यास किंवा वारंवार पाणी प्यायल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते (Mistakes To Avoid While Drinking Water). जाणून घ्या, कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी पाणी पिताना कोणत्या चुका टाळाव्यात (Drinking Water Mistakes).
पाणी पिताना करू नका या 5 चुका (Don’t Make These 5 Mistakes While Drinking Water)
1. एकाच वेळी खूप पाणी पिणे (Drinking Plenty Of Water At Once)
अनेक लोक एकावेळी खूप पाणी पितात. एवढेच नाही तर तहान लागली असेल तर एकाच वेळी गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. पण हा योग्य मार्ग नाही. खरं तर, दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु यापेक्षा जास्त पाणी प्यायल्यास सोडियमची पातळी कमी झाल्यामुळे सुद्धा समस्या उद्भवू शकते (Disadvantages Of Drinking Too Much Water).
2. वारंवार पाणी पिणे (Drinking Water Frequently)
जर तुम्ही वारंवार पाणी प्यायले तर ते अचानक सोडियम आणि रक्तातील अतिरिक्त द्रवाचे संतुलन बिघडवते, ज्यामुळे शरीरात सूज येऊ शकते. एवढेच नाही तर एडेमा होण्याचा धोकाही वाढतो.
3. उभे राहून पाणी पिणे (Drinking Water While Standing)
उभे राहून पाणी प्यायल्यास पोटावर जास्त दाब पडतो. उभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी अन्ननलिकेतून थेट दाबाने पोटात पोहोचते. यामुळे पोट आणि पोटाभोवतीची जागा आणि पचनसंस्थेचे नुकसान होऊ शकते. (Digestive System)
4. जेवताना पाणी पिणे (Drinking Water While Eating)
जेवताना पाणी प्यायल्यास पोटफुगी होऊ शकते. पाणी गॅस्ट्रीक ज्यूस पातळ करते आणि त्यामुळे अन्न पचणे कठीण होते.
विशेषतः प्रोटीन. याशिवाय रिफ्लक्सची समस्या देखील असू शकते. त्यामुळे जेवणाच्या 30 मिनिटे आधी आणि जेवणानंतर 30 मिनिटांनी नेहमी पाणी प्यावे.
5. खूप थंड पाणी पिणे (Drinking Very Cold Water)
उन्हाळ्यात, जर तुम्हालाही रेफ्रिजरेटरचे थंड पाणी प्यायला आवडत असेल, तर तुमच्या व्हॅगस मज्जातंतूला नुकसान पोहोचवू शकते.
त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Drinking Water Mistakes | mistakes to avoid while drinking water