आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जंक फुड खाण्याचे प्रमाण अलिकडे प्रचंड वाढले आहे. याचे आरोग्यावरसुद्धा गंभीर परिणाम दिसून येत आहेत. यासाठी जंक फुड खाण्याची सवय कमी करणे आवश्यक आहे. तसेच रात्रीच्या वेळी जंक फुड खाणे टाळले पाहिजे. रात्री जंक फुड खाल्ल्याने झोपेवर विपरीत परिणाम होतो. तसेच लठ्ठपणा, डायबिटीज हे आजारदेखील होऊ शकतात, असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे. जंक फुडसह रात्री कोणते पदार्थ खाऊ नयेत, याबाबत सविस्तर माहिती घेवूयात.
गोड पदार्थ
जास्त प्रमाणातील कॅलरीज आणि फॅटमुळे झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्याने झोपेवर परिणाम होतो. तसेच रक्तात अचानक इन्सूलिनचे प्रमाण वाढते.
चॉकलेट
यातील जास्त प्रमाणातील कॅफीनमुळे झोप खराब होते. झोपण्यापूर्वी कॉफी पिऊ नये, तसेच चॉकलेटही खाऊ नये.
मसालेदार जेवण
मसालेदार खाद्यपदार्थ खाल्ल्याने अस्वस्थता वाढते. पोटात आगही होऊ शकते. गॅस व अपचनाचाही त्रास होऊ शकतो.
चिकन
झोपण्यापूर्वी चिकन किंवा प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास पाचनक्षमता ५० टक्क्यांनी कमी होते. शरीर झोपेऐवजी अन्न पचवण्यावर अधिक भार देते. यामुळे चांगली झोप येत नाही.