आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी नियमित नाष्टा करणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे सकाळचा नाष्टा कधीही टाळू नये. सकाळी नाष्टा केल्यास दिवसभर उर्जा मिळते. तसेच आरोग्य चांगले राहते. परंतु नाष्ट्यात काय खावे आणि काय खाऊ नये, हे माहित असणे खूप महत्वाचे आहे. नाष्ट्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत, याविषयी आपण माहित घेणार आहोत.
पेस्ट्री, डोनट
रक्तातील शुगर वाढवाणारे पेस्ट्री किंवा डोनट सारखे पदार्थ सकाळी खाऊ नयेत. या ब्रेकफास्टमुळे शुगर वाढु शकते.
पैनकेक, चॉकलेट
पॅनकेक, चॉकलेट अशे पदार्थ खाण्यापासुन दूर राहा. हे पदार्थ सकाळी खाणे म्हणजेच आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
पॅनकेक, चॉकलेट अशे पदार्थ खाण्यापासुन दूर राहा. हे पदार्थ सकाळी खाणे म्हणजेच आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
बर्गर
सकाळच्या नाष्ट्यात बर्गर पॅटीस यांचे सेवन करु नका. ऑयली फूड खाण्यापासूनही दूर राहा. यामुळे आरोग्याला धोका पोहोचतो.
टोस्ट
सकाळी सकाळी टोस्ट आणि जॅमसुध्दा खाऊ नये. यामध्ये आवश्यकते पेक्षा जास्त कार्बोहायडरेट असते. यापेक्षा प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत.
ज्यूस
नाष्ट्यात फळांचा ज्यूस पिऊ नका. यामध्ये शुगरचे प्रमाण खुप जास्त असते. फळे खाऊ शकता. फक्त आंबट फळांचे सेवन ब्रेकफास्टमध्ये करु नका.