आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण जेव्हाही थकून जातो तेव्हा आपल्याला नेहमी चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा होते. गर्भावस्थेतही थकवा जास्त प्रमाणात वाटत असताना साहजिकच आपल्याला चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा होते. पण अशा अवस्थेत सतत चहा किंवा कॉफी पिणे हे बाळासाठीही आणि आईसाठीही योग्य नसते.
या कारणांमुळे गर्भावस्थेत असताना कॅफीनचा जास्त सेवन टाळा
गर्भावस्थेत असताना जर जास्त प्रमाणात चहा, कॉफीचे सेवन केल्यास बाळाचे वजन कमी होऊ शकते.
कॅफीनच्या जास्त सेवनाने रक्तदाबही वाढतो आणि हृदयाचे ठोकेही वाढतात. गर्भावस्थेत असे झाल्याने महिला आणि बाळावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
गर्भावस्थेत असताना महिला ज्या कोणत्याही अन्न पदार्थांचा सेवन करतात ते बाळा पर्यंत पोहचणे महत्त्वाचे असते आणि या प्रक्रियेत कॅफीनच्या जास्त सेवनाने अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून गर्भावस्थेत असताना कॅफीनचा जास्त सेवन करू नये.
चहा कॉफी सोबतच कोल्ड्रिंग, चॉकलेट आणि केक यामध्येही कॅफीनचे प्रमाण जास्त असते. १०० मिग्रॅ कॅफीनच्या सेवनाने बाळाचे २१ ते २८ ग्रॅम वजन कमी होते आणि प्रसूतीची वेळ ५ तासांनी वाढते.