आरोग्यनामा ऑनलाइन टीम – इम्युनिटी सिस्टिम म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी शरीराला आजारांशी लढा देण्याची अधिक शक्ती मिळते. आहाराच्या माध्यमातून इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यासाठी आहाराचे नियोजन केले पाहिजे. ओट्स, दूध, ग्रीन टी, संत्री, शेंगदाणे, दही, व्हेजिटेबल सॅलड, चॉकलेट, सफरचंद प्रोटीन शेक, केळी आणि ब्लूबेरी, सॅमन मासे, ब्राऊन राइस, मध, गाजर, पत्ताकोबी, मशरूम, अंडी, टोस्ट, लेमन ज्यूस, पनीर, चेरी, टोमॅटो, मिक्स्ड व्हेजिटेबल, आदी पोषक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.
ओट्स खाल्ल्यामुळे पांढऱ्या पेशी तयार होण्याचे प्रमाण वाढते. यात फायबरचे प्रमाणही अधिक असते. प्रोटीन मिळवण्यासाठी सॅमन मासे चांगले असतात. हे खाल्ल्यामुळे सेल मँब्रेन मजबूत होतात. त्यामुळे इन्फेक्शनची शक्यता कमी होते. प्रोटीन शेकमुळे ७९ टक्के प्रतिकारक क्षमता वाढत असल्याचे समोर आले. भरपूर जेवल्यामुळे पांढऱ्या पेशींचे होणारे नुकसान टोमॅटोमुळे ३८ टक्क्यापर्यंत कमी होते. डार्क चॉकलेट आणि टोमॅटोने फ्री रेडिकल डॅमेजपासून शरीराचे संरक्षण होते.
इम्युनिटी सिस्टिम मजबूत व्हावी यासाठी मशरूमला मॅजिक फूड म्हटले जाते. यात सर्वाधिक प्रमाणात हेल्थ बुस्टिंग मिनरल्स असतात. तसेच आठवड्यात पाच दिवस फळे आणि उकडलेल्या भाज्या खाव्यात.
या आहारामुळे शरीरामध्ये अमिनो अॅसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्फेक्शन आणि आजारांशी लढण्याची शक्ती मिळते. श्वसनासंबंधी आजार कमी होतात. तसेच नाष्ट्यामध्ये दही घेतल्याने हेल्दी बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. पोटासाठी ते अत्यंत फायदेशीर आहे. सॅमन मासे खाल्ल्याने शरीराला हेल्दी फॅट्स मिळतात.