Diabetes Control | ‘ड्रॅगन फ्रूट’ डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक, जाणून घ्या शुगर कंट्रोल करण्यासाठी कसे करावे सेवन
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control | ड्रॅगन फ्रूट (Dragon fruit) हे एक असे फळ आहे, त्याचे नाव ऐकल्यावर मनात एका मोठ्या वस्तूची प्रतिमा निर्माण होते. या विचित्र नावामुळे भारत सरकारने या प्रसिद्ध ड्रॅगन फ्रूटचे नाव कमलम असे ठेवले आहे. या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे (Diabetes Control). या फळाचे शास्त्रीय नाव Hylocereus undatus आहे. लोक ड्रॅगन फ्रूट कापून, सॅलड, मुरंबा, जेली आणि शेक बनवून खातात (Dragon Fruit Good For Diabetics).
ड्रॅगन फ्रूटच्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्ससह, बीटासानिन, फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक अॅसिड, अॅस्कॉर्बिक अॅसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. ड्रॅगन फ्रूटचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने मधुमेह कसा नियंत्रित (Diabetes Control) होतो ते जाणून घेऊया (Know The Health Benefits Of Dragon).
मधुमेह नियंत्रणात ठेवते हे फळ (This Fruit Controls Diabetes) :
ड्रॅगन फ्रूटमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स केळीच्या बरोबर किंवा कमी असतो. या फळाचे मर्यादित सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
हे फळ प्रीडायबेटिस आणि टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) नियंत्रित करते. ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. ड्रॅगन फ्रूट मधुमेही रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे संशोधकांना अभ्यासात आढळून आले आहे.
रिसर्चमध्ये झाला खुलासा (Research Revealed) :
पीएलओएस (PLOS) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे प्रसिद्ध झाले आहेत.
हा अभ्यास विशेषत: प्रीडायबेटिस (Prediabetes) आणि टाईप 2 मधुमेहावर होता. अॅनिमल बेस्ड स्टडीत असे आढळून आले आहे की ड्रॅगन फळ स्वादुपिंडाच्या बीटा पेशी वाढवते आणि लठ्ठपणाचा धोका कमी करते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स असतात. बीटासायनिन, व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीनने समृद्ध असलेले हे फळ शरीर निरोगी ठेवते.
भविष्यात मधुमेहाचा धोका टाळायचा असेल तर ड्रॅगन फ्रूट खा. या फळाचे सेवन केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
1. हृदयरोगांचा धोका होतो कमी (Reduces The Risk Of Heart Disease) :
युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सच्या संशोधकांच्या मते, या फळामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते.
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी होतो.
2. ब्लड प्रेशर ठेवते कंट्रोल (Controls Blood Pressure) :
हे फळ आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे ते हृदयरोगांपासून संरक्षण करते आणि रक्तदाब देखील नियंत्रित करते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Diabetes Control | dragon fruit good for diabetics know the health benefits
Seasonal Diseases | मोसमी आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी दररोज प्या ‘हा’ खास काढा; जाणून घ्या
High BP | हायपरटेन्शन म्हणजे काय, जाणून घ्या उच्च रक्तदाबाची लक्षणं, कारणं आणि उपाय