आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारतातील स्वयंपाक घरात सगळ्यात जास्त महत्त्व मसाल्यांना दिला जातो. प्रत्येक पदार्थात मसाल्यांमुळे त्या पदार्थाची चव अजूनच वाढते. धने ही या मसाल्यांमधील एक घटक आहे. धनेचा वापर करून आपण मधुमेह मुळांपासून कमी करू शकतो.
धन्याचे बी आणि पानांमध्ये ऍन्टी इन्फ्लमेन्टरी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. धने पाण्याच्या सेवनाने शुगर लेव्हल कमी करण्यात खूप मदत होते. रात्री धने भिजत घालावे, आणि सकाळी उठल्यावर उपाशी पोटी या पाण्याचा सेवन केल्याने शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते.
रक्तातील साखरेचा प्रमाण कमी करण्यात धने खूप उपयुक्त आहे. धने पाणी रक्तात मिसळल्याने रक्तातील साखरेचा प्रमाण कमी करण्याचे काम करते. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा रुग्णांनी या पाण्याचा सेवन रोज सकाळी उपाशी पोटी केल्यास खूप लाभदायक असतो .