आरोग्यनामा ऑनलाईन : अनेकदा लोक तांदूळ उत्कृष्ट समजून खात असतात. बंद पॅकेटमधील ब्राऊन राईस चांगलेच असते असे नाही. तुम्हाला माहित आहे का ? यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. प्रत्यकाने यामध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण नुकतिच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मद्रास डायबेटिक रिसर्च फाऊंडेशनचे (MDRF) खास बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या १५ पाकिटबंद आरोग्यदायी तांदळाची चाचणी केली आहे. त्यामध्ये या कंपनीने दावा फोल असल्याचे समोर आले आहे.
आरोग्यदायी तांदळाची चाचणी केलेले तांदूळ पॉलिश न केलेले आणि थेट बाजारात विक्रिस आणले आहे, असा दावा करणारी कंपनी ब्रॅंडेड तांदळाची चाचणी करण्यात आली. त्याचबरोबर डायबिटीस ज्यांना आहे त्यांच्या नावाखाली कंपन्या विकत असलेल्या ब्राऊन तांदळाची देखील चाचणी करण्यात आली. त्यावेळी कळून आले की, तांदूळ अर्धवट शिजल्यानंतर मशीनमध्ये आणि उन्हात वाळवलेले तांदूळ साधे असल्याचे संशोधकांना आढळले आहे. MDRFच्या संशोधक सुधा वासुदेवन यांनीही मान्य केले.
वासुदेवन म्हणाले की, आमच्याकडे डायबिटीस रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. येताना ते त्यांच्या आहारात सामावेश असलेले तांदूळ देखील घेऊन येतात. पण याच रुग्णांना डायबिटीस असल्याचे आढळून येते. अनेकजण बाजारात मिळणाऱ्या जीरो कॉलेस्ट्रॉल आणि शुगरफ्री तांदळाचा वापर करत असल्यामुळे आम्ही १५ प्रकारच्या तांदळाची चाचणी केली तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली. यातही डायबिटीस रुग्णांसाठी आरोग्यदायी असा दावा करणाऱ्या ब्राऊन राईसच्या कंपन्यांनी त्यांच्या तांदळात ग्लिसेमिक इंडेक्स म्हणजेच कार्बोहाइड्रेट (GI) अवघा 8.6 असल्याचे सांगितले.
वासुदेवन पुढे म्हणाले की, आंतराराष्ट्रीयस्तरावरील GI च्या प्रमाणानुसार इतके कमी GI कधीच कोणत्याच तांदळामध्ये नसते. तांदळामध्ये कमीतकमी ४० GI आढळतात. . कार्बोहायड्रेट रक्तातील साखरेवर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते त्याचबरोबर आहारात समावेश केल्यास डायबिटीस २ चा धोका टाळता येऊ शकतो.
संशोखक शोभना म्हणाल्या की, चाचणीमध्ये तांदूळ पॉलिशविरहीत असल्याचे आढळले आहे. तांदूळ शिजल्यानंतर त्याचा रंग ब्राऊन होतो. या तांदळाला पाण्याचा जास्त वापर होतो. त्यामुळे त्याचा स्टार्चचा स्तर वाढतो आणि GI चे प्रमाण देखील वाढते.