आरोग्यानामा ऑनलाइन टीम – शरीरातील आजार तसेच काही घटकांची कमतरता असल्याची शंका असल्यास डॉक्टर विविध प्रकारच्या चाचण्या करण्यास सांगतात. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर ते पाहून औषधोपचार सुरू केले जातात. यापैकी काही चाचण्या खुपच महागड्या असतात. नियमितपणे केल्या जात असलेल्या चाचण्यासुद्धा अशाच महाग असतात. परंतु, घरगुती पद्धतीनेही विनाखर्च एक आरोग्य चाचणी तुम्ही करू शकता, ज्यामधून आरोग्याबाबत खुप माहिती मिळू शकते. ही चाचणी कशी करावी, याबाबत जाणून घेवूयात. युनिव्हर्सिटी ऑफ टोरोनटोच्या असिस्टंट प्रोफेसर आणि ब्रॉडकास्ट मेडिकल जर्नलिस्ट डॉ. जोलीन हुबर यांनी ही चाचणी शोधून काढली आहे. या चाचणीतून डायबिटीज, कॉलेस्टड्ढॉल, किडनी, दुषित रक्त अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते.
अशी करा चाचणी
१ चमच्याचा मागचा भाग जीभेवर थोडावेळ हळूहळू घासा. यामुळे यावर लाळ जमा होईल.
२ त्यानंतर हा चमचा एका स्वच्छ पॉलिथिनमध्ये पॅक करा.
३ आता या पॅकला प्रकाशामध्ये एक मिनिटांपर्यंत ठेवा.
४ एका मिनिटानंतर यातून गोड गंध येत असेल तर हे डायबिटीजचे संकेत आहेत.
५ चमचावर पिवळा थर जमा झाला तर हा थायरॉइडचा संकेत आहे.
६ चमचावर गुलाबी थर जमा झाला तर हे खराब रक्ताभिसरण आणि कोलेस्टेरॉलचे संकेत आहेत.
७ पांढरा थर जमा झाला तर हा शरीरात इन्फेक्शन असल्याचा संकेत आहे.
८ चमच्यावर नारंगी रंगाचा थर जमा झाला असेल तर हा किडणीशी संबंधीत आजाराचा संकेत आहे.