आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान चक्कर अनेकवेळा चक्कर येते. हे एक सामान्य लक्षण आहे. पण काही महिलांना गर्भधारणेच्या पहिल्या ३ महिन्यात चक्कर येते. तर काहींना पूर्ण ९ महिने हा त्रास जाणवतो. त्यामुळे अनेक महिला या त्रासाला कंटाळून जातात. त्यासाठी आपण आज हे जाणून घेऊ की या त्रासावर नेमका काय उपाय करता येईल.
१) तुम्ही जेव्हा खाली बसता त्यावेळी तुमच्या शरीरातील रक्त पाय व शरीराच्या खालील भागात जमा होते. अशात जर तुम्ही अचानक उठला तर ह्रदय व मेंदूला रक्त पोहचण्यास थोडा विलंब होतो व तुम्हाला चक्कर येते. यामुळे गर्भवती असताना तुम्ही उठताना घाई करु नका हळूवार पणे उठा.
२) गरोदर पणात जर तुम्ही कुठे जास्त वेळ उभे राहिलात तरी तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता असते. यासाठी जास्त वेळ उभे राहणे टाळा. अशा परिस्थिती बसणे शक्य नसल्यास थोडा वेळ फेऱ्या मारा.
३) प्रेगन्सीमध्ये पाठीवर झोपणे टाळा. गर्भाशयाच्या वाढीमुळे ह्रदय, फुफ्फुसे आणि किडनीवर अतिरिक्त ताण येत असतो. त्यामुळे रक्तप्रवाहाची गती कमी होते. या अवस्थेत अचानक उठल्यामुळे चक्कर येण्याची व पडण्याची भीती असते.
४) प्रेगन्सीमध्ये जास्त वेळ उपाशी राहील्यास किंवा पाणी कमी प्रमाणात घेतल्यास चक्कर येण्याची शक्यता अधिक असते. यासाठी पाणी जास्त प्या.
५) गरोदरपणातील अशक्तपणामुळेही चक्कर येणे शक्य आहे. यासाठी नियमित आयर्न कॅप्सुल घ्या. तसेच आहारात पालक, मेथी व बीट सारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा.