आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी लसूण औषधी म्हणून भारतात वापरण्यात येत होता, असा उल्लेख आढळतो. कांदा व लसूण हे दोन्ही आहारात वापरले जाते. असंख्य पदार्थ असे आहेत, जे याशिवाय तयार होऊ शकत नाहीत. काही लोक लसूण उग्र वासाचा असल्याने खात नाहीत, परंतु, लसूण नियमित खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कांदा आणि लसूण दोन्ही एकत्रित खाल्ल्याने जास्त फायदा होतो. हे फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१) या दोन्हीमुळे शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात.
२) यातील अँटी ऑक्सीडेंटमुळे केसगळती होत नाही.
३) यातील एलाइल सल्फाइड्समुळे कँसरचा धोका कमी होतो.
४) रोगप्रतिकार शक्ती वाढून आजारांपासून बचाव होतो.
५) दोन्हीत सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने त्वचाविकारावर गुणकारी आहे.
६) अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.
७) अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे अस्थमापासून बचाव होतो.
८) शरीरात फॅट सेल्स निर्माण होत नाहीत. यामुळे वजन कमी होते.
९) लिव्हरच्या समस्यांपासून बचाव होतो.