आरोग्यानामा ऑनलाईन टीम – आयुर्वेदातही कडूलिंबाचे महत्व सांगण्यात आले आहे. औषधी गुणांनी युक्त अशा कडूलिंबाच्या उपायाने विविध प्रकारचे रोग बरे होतात. या झाडाची पाने, बिया, साल आणि मूळदेखील उपयुक्त आहे. अनेक रोगांवर त्यांचा वापर रामबाण ठरतो. याच्या बियांपासून तेल काढले जाते. हे तेल अतिशय गुणकारी आहे. या तेलाचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत उपाय
१ कडूलिंबाचे तेल वापरल्यास मलेरियासुद्धा दूर पळतो. हे तेल केसांच्या मुळाशी चोळल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होतो.
२ जखम किंवा खरचटल्यास हे तेल लावावे. त्यातील रसायनामुळे जखम चटकन भरून निघते.
३ दातदुखी, हिरड्यांना येणारी सूज या सगळ्या विकारांवर कडूलिंबाच्या तेलाने दात घासावेत.
४ कडूलिंबात अॅण्टिसेप्टिक गुण असल्याने हे तेल लावल्याने एक्झिमा रोगात हातापायांना येणारी सूज, खाज कमी कमी होते.
५ कडूलिंबाच्या पानांचा रस गरम पाण्यात घालून ते मिश्रण लावल्यास डाग, मुरूमे, सुरकुत्या नाहीशा झाल्याने चेहरा तजेलदार दिसतो.