आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पेरू खाल्याने अनेक फायदे होतात. हे आपल्याला माहित आहे. मात्र पेरू इतकीच पेरूची पानेही खूप गुणकारी व लाभदायक आहे. पेरूच्या पानांचे अनेक फायदे आहेत. तसेच माणसाच्या आरोग्यासाठी व व्याधी निवारणासाठी ती वापरता येतात. या पानांमुळे अनेक आजारांवर अगदी सहज मात करता येते. त्यामुळं पेरूचं नाही तर पेरूची पानेही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
पेरूच्या पानाचे फायदे खालीलप्रमाणे
१) चेहर्यावर पडलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी पेरूच्या पानांची पेस्ट करून जेथे सुरकुत्या आहेत त्या भागात लावावी. कांही दिवसांतच सुरकुत्या कमी होऊ लागल्याचे दिसते. चेहर्यावरचे डाग कमी करण्यासाठी ही पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने दिवसातून २ वेळा चेहरा धुतला तर डाग कमी होतात.
२) चेहऱ्यावरील मुरूमांसाठी पानांचा लेप चेहर्यावर लावावा. या पानांत अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या शरीरावरील मुरूम नष्ट होतात.
३) तोंडाचा वास येत असेल तर पेरूची पाने चावून थुंकावी. केस तेलकट अ्सतील तर पेरूची पाने गरम पाण्यात टाकून त्या पाण्याने केस धुवावेत. जास्तीचे तेल निघून जाते व केस चमकदार दिसतात.
४) दाताची दुखणी पेरूच्या पानांच्या काढ्याने कमी होतात. हिरड्यांची सूज व दातदुखीसाठी १५ ते २० कोवळी पाने कुस्करून पाण्यात उकळावी. पाणी निम्मे झाले की गार करावे व त्यात तुरटी व मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दातदुखी व हिरड्यांची सूज जाते.
५) पेरूची कोवळी पाने वाटून तो रस पाण्यासह पिलं तर ताप कमी होतो. उलट्या होत असतील तर या पानांचा काढा प्यायल्यास उलटी बंद होते.