जेवणानंतर थोडासा गुळ खा, होतात ‘हे’ ५ मोठे फायदे, जाणून घ्या
यासाठी करा गुळाचे सेवन
कानदुखी
थंडीमुळे कान दुखत असल्यास कानात मोहोरीचे तेल टाकावे आणि गुळ, तुप एकत्रित करुन खावे, यामुळे कान दुखीची समस्या दूर होते.
स्मरणशक्ती, मासिकपाळी
गुळाचा हलवा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. हे शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढते. थंड वातावरणात शरीरातील तापमानाला नियंत्रिक करण्याचे काम गुळ करतो. मुलींच्या मासिकपाळीच्या समस्यादेखील दूर होतात.
गॅस, अपचन
गॅस आणि अॅसिडीटीचा त्रास असल्यास जेवणानंतर गुळ अवश्य खा. गुळ आणि काळे मीठ चाटून खाल्ल्याने आंबट ढेकर येणे बंद होते.
उर्जा
गुळ सेवन केल्याने इम्युनिटी पॉवर वाढते. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे हे बॉडीला रिचार्ज करते. थकवा दूर होतो.
दमा, रक्तदाब
गुळ आणि काळ्या तिळाचे लाडू खाल्ल्याने दमा आणि सर्दीचा त्रास होत नाही. नियमित गुळ सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्ताची कमतरता असल्यास नियमित गुळाचे सेवन करावे. यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
Comments are closed.