आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Buttermilk In Summer | सध्या तापमानात वाढ होत असून, त्यापासून सध्यातरी दिलासा मिळण्याची आशा नाही. तीव्र सूर्यप्रकाश आणि घाम येणे यामुळे डीहायड्रेशन (Dehydration) होते. त्यामुळे या वेळी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे पाण्याची कमतरता भासणार नाही. पाण्याव्यतिरिक्त, आपण रस, शेक, नारळ पाणी, लस्सी आणि ताक यासारखे नैसर्गिक पेय देखील आहेत, जे आपल्याला विविध फायदे देऊ शकतात (Benefits Of Buttermilk In Summer).
आज आपण ताकाबद्दल बोलणार आहोत, जे विशेषत: उन्हाळ्यात खूप पसंत केले जाते. ताक केवळ उष्णतेपासून बचाव करत नाही, तर अन्न पचायलाही मदत करते. हे पोटासाठी अगदी हलके असते. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही उष्णतेत नियमितपणे ताक प्याल तर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील (Benefits Of Buttermilk In Summer).
ताक पिण्याचे फायदे (Benefits Of Drinking Buttermilk)
– आयुर्वेदानुसार ताक प्यायल्याने आरोग्य टिकून राहतं आणि अनेक आजार दूर होतात.
– ताक पोटासाठी हलके राहते
– ताक पचायला सोपे आहे, तसेच पचनक्रिया सुधारण्याचे कार्य करते.
– उन्हाळ्यात पोट फुगणे, पाचक समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांवर ताकाच्या नियमित सेवनाने मात केली जाऊ शकते.
ताक कसे बनवायचे (How To Make Buttermilk) ?
१/४ कप दही घ्या आणि त्यात एक कप पाणी घाला. त्यात चवीनुसार मीठ घाला. नंतर त्यात अर्धा चमचा भाजलेल्या जिर्याची पूड घालावी. हँड ब्लेंडर किंवा मिक्सीच्या मदतीने मिसळा. एका ग्लासमध्ये काढा आणि कोथिंबिरीची पाने, पुदिन्याची पाने किंवा कढीपत्त्याने सजवा. दिवसभराचे जेवण खाल्ल्यानंतर ताक प्यावे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Benefits Of Buttermilk In Summer | 4 benefits of drinking buttermilk in summers