आरोग्यनामा ऑनलाईन टीम – त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास ती रुक्ष होते आणि काळवंडते. वातावरणातील बदलामुळे त्वचेची चमक कमी होते. चेहरा सुकलेला दिसतो. त्वचेचे तेज कायम ठेवणारे काही खास घरगुती उपाय असून त्याची माहिती आपण करून घेणार आहोत.
हे उपाय आहेत गुणकारी
* संत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करावे. या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दुध मिसळून हे मिश्रण लावावे. थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल होईल.
* पिकलेल्या पपईतील गर लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
* स्किन खूप डाय असेल तर एक लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर मिसळा. याने मालिश करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने कोरडेपणा दूर होईल.
* एक चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
* काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण लावा. स्किन डाय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब करा.