आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी विशेष असतो. या काळात महिलांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच अनेक पदार्थ या काळात महिला खात नाहीत. तर काही खास पदार्थांचा आवर्जून आहारात समावेश केला जातो. तसेच प्रेग्नेंसीमध्ये काही ब्युटी प्रॉडक्ट धोकादायक ठरू शकतात. याबाबत अनेक महिलांना माहिती नसते. या धोक्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
अँटी एजिंग क्रीम
गरोदरपणात महिलांनी अँटी एजिंग क्रिमचा वापर करु नये. यातील केमिकलमुळे बाळाला नुकसान पोहोचू शकते. यामुळे या काळात अँटी एजिंग क्रिमपासून दूर राहा.
पिंपल्स क्रिम
प्रेग्नेंसीमध्ये डाग, पुरळ होणे सामान्य गोष्ट असल्याने काळजी करु नका. पिंपल्स दूर करण्यासाठी एखादी क्रीम लावत असाल तर हे बंद करा. या प्रॉड्क्टसच्या कंपन्यासुध्दा असे करण्यात मनाई करतात.
सेंट आणि तीव्र सुगंध
या काळात परफ्यूम लावू नका. याच्या तीव्र सुगंधांचा वाईट परिणाम बाळावर होतो. बाळाला भविष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
हेयर रिमूव्हल क्रीम
प्रेग्नेंसीच्या काळात हेयर रिमूव्हल क्रीमचा वापर करु नये. यातील केमिकल्स त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते.