आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक जण बाजारातील वेगवेगळ्या उत्पादनाचा वापर करतात. त्यातील सगळीच उत्पादने चांगला परिणाम देतील हे नक्की नसते आणि ही नवनवीन उत्पादने अत्यंत महागडी देखील असतात. म्हणूनच या उपायाने दीर्घकाळ आणि स्वस्तात चेहऱ्यावर तेज मिळवता येईल. तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायलास स्किनला अनेक फायदे मिळतात.
तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
१. तांब्याच्या भाड्यात साठवलेले पाणी नियमित प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येते.
२. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.
३. पिंपल आणि मुरूम येणे बंद होते.
४. शरीरातील पित्त, वात,कफ नाहीसे होतात.
५. शरीरातील उष्णता कमी होते.
६. तांब्यातील गुणांमुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत होते.
७. शरीरातील पीएच संतुलित ठेवला जातो.