आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फेसपॅक लावताना काही गोष्टींकडे लक्ष दिले तर तुमची स्किन नेहमी चमकदार आणि तरुण राहिल. फेसपॅक पुर्ण सुकेपर्यंत लावू ठेवल्याने चेहरा कोरडा पडतो आणि सुरकूत्या पडतात. फेसपॅकमध्ये थोडा ओलावा असेपर्यंत फेसपॅक राहू द्या. यानंतर तात्काळ धुवून घ्या. फेसपॅक लावाताना आणखी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे, याची माहिती घेवूयात.
ही दक्षता घ्या
* फेसपॅक ब्रेशने लावण्याऐवजी हाताने मसाज करत लावणे फायदेशीर असते. १० मिनिट मसाज करत फेसपॅक लावा आणि १५ मिनिट तसाच राहू द्या. यानंतर साधारण पाण्याने धुवून घ्या.
* फेसपॅक धुतल्यानंतर फेसटोनर गुलाब जल किंवा दुसरे काही कॉटनच्या मदतीने लावा. असे केल्याने त्वचेत ग्लो येईल आणि मॉश्चरायजर मिळेल. तुम्ही फेसक्रीममध्ये टोनर मिक्स करुनसुध्दा लावू शकता.
* अनेक लोक अंघोळी अगोदरच फेसपॅक लावतात. यानंतर आरामात अंघोळ करतात. परंतु असे केल्याने त्वचेला जास्त फायदा होत नाही. कारण अंघोळी अगोदर तुमच्या स्किनचा ओलावा खुप कमी असतो. शॉवर घेतल्यानंतर त्वचेचे छिद्र ओपन होतात आणि फेसपॅक आत पोहोचतो. ज्यामुळे त्वचा चमकदार होते. यामुळे अंघोळ केल्यानंतरच फेसपॅक लावावा.
* फेसपॅक लावल्यावर चेहरा सुकू देऊ नका. चेहरा पुर्णपणे सुकण्या अगोदरच धुवून टाका. फेसपॅक पुर्ण सुकू दिल्यामुळे स्किन कोरडी होते.