वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन कमी करण्यासाठी आपण नेहमी हाच विचार करतो कि, काय खाल्लं पाहिजे पण, कधी हा विचार करतच नाहीत कि, काय खाऊ नये. कारण प्रत्येकालाच वाटत असते कि, आपले वजन कणी असावे व व्यक्तिमत्त्व सुंदर दिसावे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती लोक वापरात असतात. वजन वाढणे जेवढे सोपे आहे तेवढे ते नियंत्रणात ठेवणे कठीण आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून आपण खालील काही खाद्यपदार्थ टाळलेच पाहिजे. जेणेकरून वजन नियंत्रित करता येईल.

फास्टफूड : क्रीम, फ्रेंच फ्राईज, चिप्स , भजी ,सारखी तळलेली पदार्थ आणि सर्वप्रकारच्या मांसाहारी जेवणाचा समावेश तुमच्या आहारात नसावा. कारण हे सर्व खाद्यपदार्थ वजन किंवा लठ्ठपणा वाढन्यास जबाबदार असतात. म्हणून या अन्नपदार्थचे सेवन करू नये.

शुगरयुक्त पदार्थ : जास्त साखर मिश्रित पदार्थांमुळे किंवा पेयजलांमुळे मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोगासारख्या आजारांना आमंत्रण देते. म्हणून कँडी, आईसक्रीम , पेस्ट्रीज, दही, बिस्कीट ही पदार्थ टाळावीत.

शुगरयुक्त पेयजल : वजन वाढण्यास जास्त प्रमाणात कारणीभूत असणारे घटक म्हणजे गोड पेयजल. त्यात सोडा, फळांचा रस, चहा, लस्सी, स्पोर्ट्स ड्रिंक या सर्वांचा समावेश होतो. त्यातच वजन वाढण्यास भर टाकणारा सर्वात हानिकारक घटक म्हणजे सोडा. जर तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचे असेल तर हे पेयजल टाळलेच पाहिजे.

प्रक्रिया केलेले पदार्थ: प्रोसेस्ड फूड आणि रिफाईंड अन्नपदार्थांचे सेवन न करणे. तसेच वजन कमी करण्यासाठी पास्ता, मैद्याची पोळी, बिस्कीट या पदार्थांचा आहारात समावेश नसावा.

अल्कोहोल टाळावे : सरासरी महिन्याला मद्यपान करणारे किंवा दारू पिणारे २००० एवढी कॅलरी साठवतात. आणि म्हणून चरबी वाढण्यास वेग येतो व तुमचे वजन वाढते. म्हणून मद्यपान करूच नये.

सिझनिंग सॉल्ट : आपण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डायट प्लान बनवतो व कमी कॅलरीचे पदार्थ खात असतो. पण आपण कमी कॅलेरीचे उकळलेले अन्न खाण्यासाठी सिझनिंग मिठाचा वापर करतो किंवा मसाल्यांना मिसळतो. पण असे अन्नपदार्थ वजन कमी करण्याऐवजी वजन वाढवतात. कारण त्यांत सोडियम असते व त्याने उच्च रक्तदाबाची समस्याही उद्भवते.