आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शारिरीक सुखामुळे मानसिक ताण कमी होतो, हे संशोधनात आढळून आले आहे. यामुळे आरोग्यदेखील चांगले राहते. त्यामुळे शरीरसुखातून मिळणारे समाधान खूप महत्वाचे ठरते. वयाच्या एका विशिष्ट काळात प्रणयक्रीडेचा आनंद अधिक प्राप्त होत असतो. अनेक जोडप्यांना याबाबत माहित नसते. किशोर अवस्थेमध्ये हार्मोन्स अधिक जोमाने वाढत असल्याने प्रणयक्रीडेबाबत उत्सुकता आणि रोमांस करण्याची इच्छा जास्त असते. नेमके कोणत्या वयात प्रणयसुख अधिक मिळते याबाबत माहिती घेवूयात.
या वयात मिळते जास्त सूख
* ३० व्या वर्षी प्रणयाचा उत्साह वयाच्या २० वर्षापेक्षा कमी झालेला असतो. पण यामध्ये सुधारणा झालेली असते. कारण वयाच्या ३० मध्ये दोन्ही पार्टनर अधिक परिपक्व झालेले असतात.
* ज्या जोडप्यांचे वय ३० च्या पुढे आहे त्यांना एकमेकांच्या प्रणयाबद्दलच्या आवडी निवडी माहित झालेल्या असतात. त्यामुळे या वयातील जोडपी या क्रीडेचा आनंद अधिक घेत असतात.
* ३५-४० या वयात येईपर्यंत पुरूष आणि महिला एकमेकांना वयाच्या ३० पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात. या वयामध्ये जोडीदाराला कशा प्रकारे सुख द्यायचे आहे आणि त्याला प्रणयादरम्यान नेमके काय आवडते हे चांगले माहित असल्याने या वयाच्या जोडप्यांमध्ये करण्यात येणारा प्रणय उत्तम आणि संतुष्टी देणारा असतो. या वयामध्ये जरी प्रणयामध्ये अधिक संतुष्टी मिळत असली तरी प्रणय करण्याचा कालावधी कमी झालेला असतो.
* वयाच्या ३५ ते ४० दरम्यान महिलांच्या हार्मोलनमध्ये मोठे बदल होत असतात. या वयामध्ये महिला मेनोपॉजच्या जवळ असल्याने त्यांच्या स्वभावात बदल होतात. आरोग्या संबंधीच्या अडचणी असतात. यामुळे प्रणयक्रीडा प्रभावित होण्याची शक्यता असते.