‘हुलगे’ खा आणि अनेक आजारांपासून दूर राहा

July 8, 2019
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या आरोग्यासाठी कडधान्य हे खूप उपयुक्त असतात. त्यामुळे आपण कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. असे अनेक आहार तज्न आपल्याला सांगत असतात. हुलगे हे ही कडधान्यांमध्ये मोडते. आणि याच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे हुलगे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

हुलगे खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :

१) हुलगा हा आजारी व्यक्तीसाठी फायदेशीर मानला जातो. कारण लघवीच्या विकारांमध्ये जर हुलग्याचा काडा घेतला तर आराम मिळतो.

२) हुलगे खाणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

३) आपल्या शरीराच्या कोणत्याही सुजेवर हुलगे हे लाभकारी आहे.

४) हुलग्यामुळे आपल्या शरीरातील लोहचं प्रमाण वाढत त्यामुळे हुलगे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

५) हुलगा हा पदार्थ आपल्या शरीरातील मेद कमी करतो.

६) अंगाला जर खूप घाम येत असेल तर हुलग्याच्या पिठाचे उटणे अंगाला लावले तर घाम कमी येतो.