आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अन्न व्यवस्थित पचन न झाल्यास त्याचे अनेक परिणाम पोटाच्या आरोग्यावर होत असतात. अनेकदा खूप जास्त खाल्ल्याने अथवा दीर्घकाळ काहीच न खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास होतो. अॅसिडिटीचा त्रास घालवण्यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे घेतल्यानंतर काही प्रमाणात हा त्रास कमी होतो. परंतु, या औषधांचे साईड इफेक्ट होऊ शकतात. तसेच सवय सद्धा लागू शकते. अशा औषधांनी अॅसिडिटीचा त्रास कमी होत असला तरी मुळ समस्या दूर होत नाही. यासाठी काही घरगुती उपाय अधिक परिणामकारक ठरतात.
अॅसिडिटीचा त्रास टाळण्यासाठी ठरावीक अंतराने थोडा-थोडा आहार घ्यावा. यामुळे पोट रिकामे किंवा जास्त भरलेले राहत नाही. परिणामी अॅसिडिटी होण्याची शक्यता कमी होते. तसेच जेवण केल्यानंतर बडीशेप खावी. खाल्लेले अन्न पचवण्यासाठी बडीशेप महत्त्वाचा घटक ठरतो. बडीशेपमुळे अॅसिडिटी कमी होते. अॅसिडिटीने त्रस्त झाल्यावर थोड्या-थोड्या अंतराने थंड दूध प्यावे. अॅसिडिटीने हृदयदाह होत असल्यास लगेच तुळशीची पाने चावल्यास आराम मिळतो.
अॅसिडिटी झाल्यास च्यूइंगम चावून चघळावे. च्यूइंगममुळे तोंडात सलाइवा निर्माण होतो. सलाइवा हे एल्कलाइन घटक असणारे अॅसिड असल्याने अॅसिडिटी कमी होते. तसेच आहारात भरपूर फळे आणि भाजीपाल्याचा समावेश असावा. पॉलिश न केलेल्या डाळी खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात फायबर मिळते. अतिरिक्त फायबर अॅसिड शोषून घेतो. फळात केळी, पपई, काकडी आणि कलिंगड खाण्यास प्राधान्य द्यावे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी शरीरातून अतिरिक्त अॅसिड बाहेर काढते. दिवसातून तीनवेळा नारळ पाणी प्यायल्याने अॅसिडिटी कमी होते.