* हिरव्या पालेभाज्या, फळे आणि मोड आलेली कडधान्ये यांचा वापर वाढवा.
* पपई आणि केळी खाल्ल्यानेही चांगला फायदा होतो.
* काही दिवस हाय फॅट आणि लो फायबर आहारापासून दूर राहा. यामध्ये प्रक्रियायुक्त अन्न, मांसाहार किंवा डेअरी प्रॉडक्ट यांचा समावेश आहे.
* प्रत्येक जेवणात बटरमिल्कचा वापर वाढवा.
* दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी, एक अथवा दोन ग्लास फ्रूट ज्यूस, भाज्यांचा रस अथवा सूप घेऊ शकता. दिवसाची सुरुवात ज्यूसने करा.
* रात्री झोपताना आठ ते दहा काळ्या मनुका खा. दिवसांतून ३० मिनिटे चाला, काही वेळ व्यायाम, योगासने करा. व्यायाम करण्याने पचनशक्ती चांगली राहते. पोटांच्या स्नायूंची हालचाल होते.
* भुजंगासन किंवा कपालभारती प्राणायाम करा. जेवणानंतर दहा मिनिटे वज्रासनात बसा.
* शिरूविलवादी कश्याम, गंधरवा हरिथाकी चूर्ण, असे आयुर्वेदिक उपाय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा.