आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही असे आजार आहेत की ज्यामुळे अवघ्या २४ तासांत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्यातील काही आजारांवर उपचार आहेत तर काहींवर नाहीत. यासाठी अशा आजाराची लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब उपचार करणे आवश्यक असते. यापैकी काही आजार झाल्यास व्यक्ती अत्यावस्थ होते. परंतु, योग्यवेळी योग्य उपचार केल्यास प्राण वाचूही शकतो. तसेच काही आजारांवर आजही योग्य औषधोपचार नाहीत. अशाप्रकारे कोणते आजार जीवघेणे ठरू शकतात, याविषयी जाणून घेवूयात.
चॅगस रोग
हा उष्णकटिबंधीय परजीवी रोग असून चुंबन कळी नावाच्या कीटकातून तो पसरतो. या रोगाची लागण झाल्यास आजारी व्यक्तीचा २४ तास ते १० वर्षांपर्यंत कधीही मृत्यू होऊ शकतो. या रोगामुळे काही देशांत महामारीसुद्धा आली होती. साधा ताप, उलटी, हृदयावर आणि मेंदूवर सूज ही याची लक्षणे आहेत.
इबोला
इबोला विषाणू रोग किंवा इबोला रक्तस्त्रावी ताप हा मनुष्य व इतर सस्तन प्राण्यांना होणारा एक रोग आहे. हा रोग इबोला नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे होतो. ताप, घसादुखी, स्नायूदुखी, उलट्या ही त्याची लक्षणे आहेत. याचा रोगी २४ तास ते १६ दिवसांत मृत्यूमुखी पडण्याची शक्यता असते. हा रोग संसर्गजन्य आहे. एबोला रोगावर सध्या कोणताही अधिकृत उपचार किंवा लस उपलब्ध नाही.
प्लेग
यर्सिनिया पेस्टिस या जंतूंमुळे हा रोग होतो. प्लेग सामान्यतः वन्य व घरगुती कृंतक प्राण्यांतील यर्सिनिया पेस्टिस नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे संसर्गित पिसूद्वारे मानवात संसर्ग होणारा आहे. हा संसर्गजन्य रोग आहे. इंग्रजांच्या काळात या रोगाने भारतात महामारी पसली होती.
नेक्रोटाइजिंग फेसाइटीस
हा एक त्वचा रोग आहे. याची लागण झाल्यानंतर रुग्णाला प्रचंड वेदना होतात. तो त्या सहनच करू शकत नाही. त्वचेवर पुरळ उठणे, फोड येणे ही याची लक्षणे आहेत.
डेंग्यू
डेंग्यू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित होतो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप अशा दोन प्रकारे होतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.