‘या’ ८ कारणांमुळे पीरियड्स मिस होण्याची असते शक्यता, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वेळेवर पीरियड्स न येणे समस्या अनेक अनेक मुलींमध्ये दिसून येते. ही समस्या दिर्घकाळ राहिल्यास अनेक प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडून उपचार करणे गरजेचे असते. पीरियड्स मिस होण्याची ८ कारणे जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१ सतत तणावात राहणे
सतत तणावात राहिल्याने शरीरात कार्टिसोल आणि एस्टरोजन होर्मोन्सचे प्रमाणा वाढते. या हार्मोन्समुळे पाळी योग्यवेळी येत नाही.
२ थायरॉइडची समस्या
घश्यामधील थॉयराइड ग्लँड अंडरअॅक्टिव्ह अथवा ओव्हर अॅक्टिव्ह झाल्याने शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते. यामुळे पाळी मिस होऊ शकते.
३ डायबिटीज
शरीरातील साखरेची पातळी बिघडल्याने हार्मोन्सचेही नियंत्रण बिघडते, यामुळे पाळी योग्य वेळी येत नाही.
४ गर्भनिरोधक गोळी
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने साईड इफेक्टमुळे हार्मोनल नियंत्रण बिघडते आणि पाळी योग्यवेळी येत नाही.
५ वाढते वय
महिलांनी वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर ओव्हेरियर फेलियरची समस्या निर्माण होते. अशा वेळी पीरियड्स मिस होऊ शकतात.
६ लठ्ठपणा
लठ्ठपणा वाढल्यामुळे मेंदूतील हायपोथेलेमस ग्लँडवर वाईट परिणाम होतो. यामुळे हार्मोनल नियंत्रण बिघडते आणि परियड्स मिस होऊ शकते.
७ जास्त व्यायाम
जास्त व्यायाम केल्याने शरीरात परिपूर्ण एस्टरोजन निर्माण होत नाहीत. परिणामी पीरियड्स मिस होऊ शकतात.
८ पोलीसिस्टीक ओव्हरी सिम्पट्म्स
पीसीओसी समस्येमुळे महिलांच्या शरीरात मेल हार्मोनचे प्रमाण वाढते. अशा वेळी इनफर्टिलिटी आणि पाळी चूकण्याची शक्यता असते.
Comments are closed.