आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यापैकीच जिरे आणि काळी मिरी हे दोन पदार्थ आहेत. हे दोन पदार्थ विविध आजारांवर गुणकारी औषध म्हणून वापरले जातात. जिरे पचनक्रियेसाठी खुपच लाभदायक आहे. हे दोन्ही मसाले एकत्र करून दुधात टाकून घेतल्यास यामधील मिनरल्स शरीराला फायदेशीर ठरतात. काळी मिरी आणि जिरे दुधाचे ८ फायदे आपण जाणून घेणार आहोत.
असे तयार करा दूध
अर्धा चमचा जिरे आणि ४-५ काळी मिरी बारीक करून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधामध्ये हे मिश्रण टाकून प्यावे.
होतील हे फायदे
अॅसिडिटी
शरीरात अॅसिड निर्माण होत नाही. पोट फुगणे, अॅसिडिटी हे त्रास होत नाहीत.
ताप
शरीराची इम्युनिटी वाढते. सर्दी, खोकला आणि तापामध्ये आराम मिळतो.
अंगदुखी
रक्ताभिसरण चांगले झाल्याने सांधेदुखी आणि अंगदुखी होत नाही.
बॉडी डिटॉक्स
शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे आजार होत नाहीत.
बद्धकोष्ठता
यामुळे डायजेशन चांगले होते. बद्धकोष्ठता होत नाही.
रक्ताची कमतरता
यातील पोषकतत्व रक्तातील लाल पेशींना निरोगी ठेवतात. रक्ताची कमतरता दूर होते.
डोकेदुखी
यामुळे तणाव दूर होतो. मेंदू रिलॅक्स झाल्याने डोकेदुखी होत नाही.
पोटदुखी
पचनक्रिया व्यवस्थित झाल्याने पोटदुखी होत नाही.