हे आहेत फायदे
* रात्री झोपण्यापूर्वी फुलकोबीचा रस पिल्यास अॅसिडिटी दूर होते. लघवी जळजळ होत असल्यास जास्त प्रमाणात फुलकोबी खावी.
* कावीळ झालेल्या रुग्णांनी फुलकोबी आणि गाजराचा रस समान मात्रेमध्ये एकत्र करून दररोज १ ग्लास घ्यावा.
* फुलकोबीची पाने कुटून त्यांचा रस तयार करावा. या रसाने गुळण्या केल्यास हिरड्यांमधून रक्त येणे बंद होते. कच्ची फुलकोबी चावून खाण्याने हिरड्यांवरील सूज कमी होते.
* कोबीच्या पानांपासून तयार केलेल्या रसाचे दररोज सेवन केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होतो. कमीत कमी तीन महिने या रसाचे सेवन केल्यास शरीरातील इतर वेदना नष्ट होतात.
* दररोज रिकाम्यापोटी एक कप कोबीच्या रसाचे सेवन केल्यास आतड्याचा आजार आणि पोटदुखीचा त्रास कमी होतो.
* फुलकोबीच्या पानांच्या रसाचे सेवन केल्यास मानेवरील सूज आणि गळ्याशी संबंधित इतर विकारांवरही बरे होतात.
* कच्ची फुलकोबी स्वच्छ धुवून चावून चावून खाल्ल्यास रक्त शुद्ध होते तसेच विविध त्वचा रोग दूर होतात. शाररीक शक्ती वाढते.