आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पौरुषत्व आणि तारुण्य कायम ठेवण्यासाठी काही खास पदार्थ असून ते सहज उपलब्ध होऊ शकतात. शिवाय, याचे कोणतेही साईड इफेक्ट सुद्धा होत नाहीत. या पदार्थांचे सेवन सुरु केल्यास एखाद्या जादुप्रमाणे पुरूषांमध्ये फरक दिसून येतो. उदाहरणार्थ पेंड ही पशुखाद्य म्हणून वापरली जाते, परंतु शारीरिक ताकद वाढवण्यासाठीसुद्धा ही रामबाण उपाय आहे. ५० ग्रॅम सरकी पेंड भाजून पावडर तयार करून घ्यावी. त्यानंतर एवढ्याच प्रमाणात यात मुसळी मिसळून घ्यावी. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तीन-तीन ग्रॅम हे मिश्रण दुधातून घ्यावे. या उपायाने ताकद आणि वीर्य वाढण्यास मदत होते.
मालकांगोणी
ही भारतात आढळणारी आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये या वनस्पतीला ज्योतिष्मती म्हणतात. २५० ग्रॅम मालकांगोणी गायीच्या शुद्ध तुपात भाजून घेऊन यामध्ये तेवढीच साखर टाकून पावडर तयार करा. ४० दिवस ही पावडर सहा ग्रॅम प्रमाणात घेऊन गाईच्या दुधातून सकाळ-संध्याकाळ घ्या. यामुळे ताकद आणि यौनशक्ती वाढते.
हरभरे
रात्रभर १०० मिलीलीटर कच्च्या दुधात भिजवलेले ५० ग्रॅम हरभरे सकाळी मनुका आणि बारीक खडीसाखरसोबत चावून खा. जवळपास ४० दिवस नियमितपणे अशाप्रकारे हरभरे खाल्ल्यास ताकद आणि वीर्य वाढते.
पांढरी मुसळी
आवळा पावडर, गुळवेल रस, पांढरी मुसळी पावडर, गोखुर पावडर एकत्र करून घ्या. या मिश्रणात बारीक खडीसाखर मिसळून ठेवा आणि दररोज सकाळ-संध्याकाळ १० ते १५ ग्रॅम हे मिश्रण गरम दुधातून घ्या. हे चूर्ण तीन ते चार महिने नियमितपणे घेतल्यास व्यक्तीची यौनशक्ती वाढते.
गव्हाची खीर
गहू पाण्यात भिजवून त्याचे साल काढून घ्या आणि गाईच्या दुधात खीर तयार करा. दररोज ही खीर खाल्ल्यास ताकद वाढते आणि संभोगशक्तीचा विकास होतो.
लिंबू आणि मनुका
रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक लिंबू पिळून त्यामध्ये दोन-तीन मनुका भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून चहासारखे प्या. त्यानंतर ग्लासातील मनुका चावून खा. शक्ती आणि पौरुषत्व वाढते.
दालचिनी
दालचिनीसुद्धा संभोगशक्ती वाढवण्यास मदत करते. थोडीशी दालचिनी बारीक करून पावडर तयार करून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी जवळपास २ ग्रॅम पावडर गरम दुधातून मधासोबत घ्या. या उपायाने यौनशक्ती वाढेल तसेच वीर्य म्हणजे धातूची कमतरता दूर होईल.