आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चूना सुमारे ७० आजार बरे करू शकतो, असे संशोधनात आढळून आले आहे. यामध्ये अँटीबायोटिक, अँटीफंगल आणि अँटीइंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. चून्यातील कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट शरीर निरोगी ठेवते. याचे पाणी, डाळ, दही किंवा ज्यूसमध्ये मिसळून पिता येते. चून्याचे ६ फायदे आपण जाणून घेणार आहोत.
१ गव्हाच्या दाण्याएवढा चुना लहान मुलांना रोज खाण्यात किंवा पाण्यात मिसळून दिल्यास त्यांची उंची वाढू शकते.
२ रोज गव्हाच्या दाण्याएवढा चूना पाण्यात मिसळून प्या. यामुळे डोळ्यांची शक्ती वाढवण्यात मदत मिळते.
३ रोज गव्हाच्या दाण्याएवढा चूना खाल्ल्याने पीरियड्स रेग्यूलर होतात. वेदना दूर होतात.
४ रोज ज्यूसमध्ये गव्हाच्या दाण्याएवढा चुना मिसळून प्यायल्यास स्पर्म काउंट आणि फर्टिलिटी वाढते.
५ रोज आहारात गव्हाच्या दाण्याएवढा चूना घेतल्यास स्मरणशक्ती वाढते.
६ काविळ झाल्यावर रोज ज्यूस किंवा पाण्यात चुना मिसळून प्यायल्यास काविळची समस्या दूर होते.