आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विविध उपाय करूनही वाढलेले पोट कमी होत नसेल तर मधाचा उपयोग करून पोट कमी करणे शक्य आहे. यामुळे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. मधाचे सेवन करुन शरीरातील फॅट बर्न करता येते. या पाच पध्दतींचा वापर करून वाढलेले पोट जलदगतीने कमी करता येते. यावरील उपाय आपण जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ पोट कमी करायचे असेल तर आहारात थोडे बदल करणे आवश्यक आहे. ब्राउन ब्रेड आणि मधाचा वापर करु शकता. ब्राउन ब्रेडला मधाचा पातळ थर लाऊन तुम्ही खाऊ शकता. यात कॅलरी कमी आणि एनर्जी जास्त असते. तसेही रात्री हलके जेवण करावे.
मधाचा वापर करा
तेलाऐवजी मधाचा वापर करु शकता. तुम्ही मधात काही तळू शकत नाही. परंतु पदार्थांमध्ये याचा वापर नक्की करु शकता. अशा प्रकारे तयार केलेले जेवण स्वादिष्ट लागते. वजन कमी करण्यातदेखील मदत करते.
दूध आणि मध
कोमट दूधात मध टाकून प्यायल्याने वाढलेली चरबी लवकरात लवकर कमी होते. उकळलेल्या दूधात कमी कॅलरी असतात. ज्यामुळे वजन वाढत नाही. या दूधात मध टाकल्याने दुप्पट फायदा होतो.
गरम पाण्यात मध टाकून घ्या
कोमट पाण्यात मधाचे काही थेंब टाका. यात थोडासा लिंबूचा रस टाकला तर याचा जास्त फायदा होईल. सकाळी उपाशापोटी याचे सेवन केल्याने खुप फायदा होतो.
ओट्ससोबत मध
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये ओट्स आणि मधाचे सेवन करा. ओट्स आणि मधाच्या सेवनाने दिवसाची सुरूवात हेल्दी होईल. तसेच पोट दुप्पट गतीने कमी होईल.