आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवसभरात प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक वस्तू हाताळत असतो. यापैकी बहुतांश वस्तू आपल्याला स्वच्छ दिसतात. परंतु, त्या अनेकदा स्वच्छ नसतात. अशा वस्तूंची नेहमी स्वच्छता राखणे आवश्यक असते. अशा काही वस्तूंबाबात आपण माहिती घेणार आहोत.
मोबाइल
दिवसभर मोबाइल आपण हाताळत असतो. यामुळे मोबाइलवर हानिकारक बॅक्टेरिया जमा होतात.
डेस्क
ऑफिसमधील डेस्कवरसुध्दा अनेक बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया जेवणातून किंवा एखादा पदार्थ खाताना शरीरात जाउ शकतात. यामुळे डेस्क नियमित स्वच्छ करा.
रिमोट
अनेक घरात रिमोटची स्वच्छता केली जात नाही. अनेकजण त्याचा वापर करत असल्याने त्यावर असंख्य बॅक्टेरिया असतात.
हँडबॅग
हँडबॅगमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. दिर्घकाळ हँडबॅगची स्वच्छता केली नाही तर नोरोव्हायरस आणि एमआरएसएसारखे किटाणू त्यामध्ये तयार होतात, असे संशोधनात आढळून आले आहे. यासाठी बॅग नेहमी स्वच्छ ठेवावी.
बेडशीट
बेडशीट आणि उशी आपल्याला नेहमी स्वच्छ दिसते. परंतू धूळीचे अनेक कण त्यावर जमा होतात. यामुळे अॅलर्जी होऊ शकते. तसेच बॅक्टेरिया सुद्धा जमा होतात. यामुळे अॅलर्जी आणि दमा होण्याचा धोका असतो.