आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्मोकिंगमुळे लंग कँसर होतो, असे सांगितले जाते. मात्र, जे लोक स्मोकिंग करत नाही त्यांनाही हा गंभीर आजार होऊ शकतो. यामागे विविध कारणे असून वेळीच सावधगिरी बाळगल्यास लंग कँसरपासून बचाव करणे शक्य आहे. स्मोकिंग न करणाèयांनाही लंग कँसर होण्याची ५ कारणे आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत कारणे
१ एस्बेटॉस फायबर
हे फायबर दुकान तसेच घराच्या छतावर टाकतात. यातील केमिकल्स श्वासामार्फत फुफ्फुसापर्यंत पोहचते. यामुळे लंग कँसर होऊ शकतो.
२ कारखान्यामध्ये काम केल्याने
ज्या कारखान्यांमध्ये आर्सेनिक, कोळसा, न्यूज पेपर प्रिंटींगचे काम केले जाते, त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना हा आजार होऊ शकतो.
३ लंग फायब्रोसिस
ज्यांना लंग फायब्रोसिसची समस्या असते त्यांना हा आजार होऊ शकतो.
४ क्रॉनिक ब्रॉनकाइटिस
ज्या लोकांना क्रॉनिक ब्रॉनकाइटिसची समस्या असते, त्यांना लंग कँसर होऊ शकतो.
५ जेनेटिक
घरात आई-वडिलांना लंग कँसर असेल तर मुलांमध्ये हा आजार होऊ शकतो.