आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वातावरणात जास्त गारवा असल्यास आरोग्य जपणे खूप महत्वाचे असते. अशा वेळी टॉक्सिन्स वाढतात. शरीराची इम्यूनिटी कमी असते. या काळात इम्यूनिटी वाढवणे खुप महत्त्वाचे असते. आहारमुळे इम्यूनिटी वाढवण्यात मदत मिळते. इम्यूनिटी वाढवण्यासाठी काही उपायांची माहिती जाणून घेवूयात.
तेल टाकून अंघोळ
इम्यूनिटी वाढवण्यासाठी गरम पाण्यात तेल टाकून अंघोळ करणे खुप फायदेशीर असते. यासाठी गरम पाण्यात मीठ किंवा विलायची, तुळस किंवा रोजमेरीचे तेल मिसळून शकता.
गरम तेलाने मालिश
मालिश हा इम्यूनिटी वाढवण्याचा सर्वात चांगला विधी आहे. तिळ किंवा सुर्यफुलाच्या तेलाचा उपयोग केल्याने मासपेशी मजबूत होतात. रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे इम्यूनिटी वाढते.
मसाल्यांचा समावेश
हवामान थंड असताना आहारात मसाल्यांचा समावेश करा. यामुळे तुमची इम्यूनिटी वाढवण्यात मदत होईल. जिरे, हळद, धने, अद्रक आणि काळ्या मिरे नियमित आहारात घ्यावे. यामुळे सर्दी आणि फ्लूपासून बचाव होईल.
थंड पेय
गारठा असल्यास थंड पदार्थ किंवा शितपेय घेऊ नका. हे पाचक रसचा प्रभाव कमी करते. यामुळे विषारी पदार्थ जास्त निर्माण होतात. यामुळे या काळात थंड पदार्थ अव्हॉइड करावेत.